home page top 1

ती आली, तिनं पाहिलं अन् चक्‍क टी-शर्ट बॅगेत टाकला ! पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी युवती CCTV त कैद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या चोरीचा प्रकार घडू नये यासाठी अनेक ठिकाणी सुरक्षेच्या कारणावरून सीसीटीव्ही लावण्यात येतात. बऱ्याचदा चोरी करणाऱ्या चोरांकडून हीच बाबा लक्षात घेतली जात नाही आणि तो चोर सापडला जातो. असाच एक प्रकार पुण्याच्या एफ सी रोडवर घडला आहे.

एफ सी रोडवरील शिरोळे मार्केटमध्ये एक तरुणी लाल रंगाचा टी शर्ट घालून आणि खांद्यावर बॅग घेऊन नवे टी शर्ट घेण्यासाठी दुकानात गेली तिने एक दोन टी शर्ट पाहिले देखील मात्र दुकानदार व्यस्त असल्याचे लक्षात येताच तिने ताबडतोब एक टी शर्ट बॅगेत टाकला आणि ती निघून जाऊ लागली मात्र तरुणी दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आपल्याला कोणीतरी पहात असेल हे विसरली.

तरुणीच्या चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या तरुणीला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं. पोलिसांच्या दामिनी पथकाच्या बिट मार्शलने ही चोरी रंगेहाथ पकडली. महत्त्वाचं म्हणजे टी शर्ट चोरणारी युवती पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती.

चोरी करणारी तरुणी पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आली होती मात्र तिने केलेल्या या कृत्यामुळे पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

visit : policenama.com

Loading...
You might also like