पुणे शहर,ग्रामीण मधील 2200 पोलिस अधिकारी,कर्मचारी पिंपरीत 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालय लवकरच सुरू होणार असल्याने पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिस दलातील तब्बल 2200 पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाच्या आस्थापनेवर वर्ग करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयासाठी एकुण 4 हजार 840 मनुष्यबळाची गरज आहे. त्यापैकी तब्बल 2 हजार 633 पदे नव्याने निर्माण करण्याची गरज असून ती 3 टप्प्यात निर्माण केली जाणार आहे. पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिस दलातील 2 हजार 207 पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाकडे वर्ग करण्यात येणार आहे. पुणे शहर पोलिस दलातील एक पोलिस उपायुक्‍त, एक सहाय्यक पोलिस आयुक्‍त, 27 पोलिस निरीक्षक, 22 सहाय्यक निरीक्षक, 82 पोलिस उपनिरीक्षक, 188 सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, 376 पोलिस हवालदार, 371 पोलिस नाईक, 781 पोलिस शिपाई आणि 6 अकार्यकारी दल (मंत्रालयीन कर्मचारी व वर्ग-4) अशा एकुण 1 हजार 855 जणांना पिंपरी-चिंचवडच्या आस्थापनेवर वर्ग करण्यात येणार आहे तर पुणे ग्रामीण पोलिस दलातील एक पोलिस उपायुक्‍त (अप्पर अधिक्षक), एक सहाय्यक आयुक्‍त (उपविभागीय अधिकारी), 4 पोलिस निरीक्षक, 6 सहाय्यक निरीक्षक, 13 पोलिस उपनिरीक्षक, 34 सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, 79 पोलिस हवालदार, 89 पोलिस नाईक आणि 127 पोलिस शिपाई अशा एकुण 352 जणांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयात नेमणुक करण्यात येणार आहे. पुणे शहर पोलिस दलातील 1 हजार 855 आणि पुणे ग्रामीण पोलिस दलातील 352 अशा एकुण 2 हजार 207 पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयात लवकरच नियुक्‍ती होणार आहे.

आयुक्‍तालयासाठी लागणारी 2 हजार 633 ही पदे आगामी 3 टप्प्यात निर्माण करण्यात येणार आहेत. नवीन निर्माण करण्यात येणार्‍या पहिल्या टप्प्यात (म्हणजेच 2 हजार 633 पदे निर्माण करताना) आयुक्‍त,अप्पर आयुक्‍त, 2 उपायुक्‍त, 7 सहाय्यक आयुक्‍त, 24 पोलिस निरीक्षक, 36 सहाय्यक निरीक्षक, 65 उपनिरीक्षक, 88 सहाय्यक उपनिरीक्षक, 174 पोलिस हवालदार, 336 पोलिस नाईक आणि 744 पोलिस शिपाई एवढी पदे निर्माण करण्यात येणार आहेत. दुसर्‍या टप्प्यात 7 पीआय, 14 एपीआय, 29 पीएसआय, 32 एएसआय, 61 हवालदार, 114 पोलिस नाईक आणि 259 पोलिस शिपाई तर तिसर्‍या टप्प्यात 5 पीआय, 8 एपीआय, 26 पीएसआय, 31 एएसआय, 55 हवालदार, 112 पोलिस नाईक आणि 252 पोलिस शिपाई यांची पदे निर्माण केली जाणार आहेत. म्हणजेच निर्माण करावयास लागणार्‍या 2 हजार 633 पदांपैकी 1 हजार 478 पदे पहिल्या, 516 पदे दुसर्‍या आणि 489 पदे तिसर्‍या टप्प्यात निर्माण करण्यात येणार आहेत. 2 हजार 633 पैकी 2 हजार 483 पदे ही कार्यकारी असून इतर पदे ही अकार्यकारी आहेत.

संबंधित घडामोडी:

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍त अप्पर पोलिस महासंचालक दर्जाचे

पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयासाठीचे नोटिफिकेशन जारी