पुण्यात एस. एम. जोशी पुलाखाली एकाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नवी पेठेतील एस. एम. जोशी पुलाजवळ एकाने लोखंडी एंगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी समोर आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे.

वसंत दामोदर पायगुडे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एस. एम. जोशी पुलाखाली एका व्यक्तीने गळफास घेतल्याचे तेथून ये जा करणाऱ्यांनी पोलिसांना सांगितली. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून देण्यात आला आहे. पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.