Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’मुळं 24 तासात 11 जणांचा मृत्यू तर 106 नवे पॉझिटिव्ह, आतापर्यंत 284 बळी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं सर्वत्रच थैमान घातलं आहे. पुणे शहरात कोरोनामुळं गेल्या 24 तासात 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 106 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळं आतापर्यंत 284 जणांचे बळी गेले आहेत. दरम्यान, उपचारानंतर बर्‍या होणार्‍या रूग्णांची संख्या देखील वाढत आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, महत्वाचे काम असल्यास मास्क परिधान करावे असे आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येत आहे.


पुणे शहरात 5533 कोरोनाबाधित असून त्यापैकी 2190 अ‍ॅक्टीव्ह आहेत. आतापर्यंत 3059 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात 184 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यामध्ये नायडू हॉस्पीटलमधील 108, ससूनमधील 10 आणि इतर खासगी रूग्णालयातील 66 जणांचा समावेश आहे. अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 171 क्रिटिकल रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 50 रूग्ण व्हेंटिलेटवर उपचार घेत आहेत. पुणे शहरात आतापर्यंत 284 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामध्ये एक रूग्ण ग्रामीणचा आहे. शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 5533 आहे. गेल्या 24 तासात 11 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे तर 106 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत.