पुण्यात पावसाळ्यात टँकरची संख्या 5 हजारांनी वाढली, सत्ताधारी भाजपचे अपयश ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ‘चला चला दुपार झाली.. गाडी पार्क करून होडी काढण्याची वेळ झाली ‘ ,पुण्यात एवढा पाऊस पडतोय की आता मोड, आणि कोंब येतील ‘ , असे पुणेरी जोक सध्या धुमाकूळ घालत असले तरी आजही पुणेकरांच्या घशाला कोरड च पडली आहे. ती केवळ बकलीकरण आणि नियोजनातील अपयश यामुळेच… हे डेक्कन जिमखाना, गोखलेनगर, बोपोडी , धानोरी, कोंढवा, हडपसर यासारख्या परिसरातील नागरिकांनी पाणी पुरवठ्या साठी पुकारलेल्या एल्गारामुळे हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. पुण्यात पावसाने शंभरी ओलांडली तरी जुलै आणि ऑगस्ट मधील टँकरची संख्या मागील तीन वर्षात पाच हजारांनी वाढल्याने पुण्याचा पाण्याची समस्या ही नागरीकरणामुळे की टँकर लॉबी साठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुण्यात शिवाजीनगर मतदार संघातील डेक्कन जिमखाना, गोखलेनगर, औंध, बोपोडी परिसरातील नागरिक मागील वर्षभरापासून कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या समस्येला तोंड देत आहेत. तर एनआयबीएम, कोंढवा, हडपसर परिसरातील नागरिक मागील अनेक वर्षे रात्री, बेरात्री आंदोलन करून रोष व्यक्त करत आहेत. मागील वर्षभराच्या कालावधीत टँकरसाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याचे या आंदोलनातून तळतळून सांगत आहेत. तर धानोरी येथील नागरिकांनीही यंदा मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचे जाहीर करत उमेदवार आणि राजकीय पक्षांचे लक्ष वेधले आहे.

यानिमित्ताने सध्याच्या टँकरचामागील पाच वर्षांचा आढावा घेतला. तर त्यातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. धरणातील पाणी साठा कमी असतो त्या मे आणि जून महिन्याची तसेच पाऊस सुरू होऊन धरणे भरत असतानाच्या जुलै व ऑगस्ट महिन्यातील टँकरच्या फेऱ्यांची तुलना केल्यावर अनेकांचे डोळे विस्फारतील अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मे 2015 – 16 मध्ये टँकरच्या15 हजार 647 फेऱ्या झाल्या, तर जून मध्ये 14, 219. मे 2016 – 17 मध्ये 20 हजार 254 तर जून मध्ये 18 हजार 933, मे 2017- 18 मध्ये 17 हजार 537 तर जुन मध्ये 17 हजार 537, मे 2018- 19 मध्ये 20 हजार 44 तर जून मध्ये 18, 865, तर चालू वर्षी मे मध्ये 25 हजार 788 तर जून मध्ये 27 हजार 220 फेऱ्या झाल्या आहेत.जुलै 2015 – 16 मध्ये 14 हजार 185 तर ऑगस्ट मध्ये 14 हजार 167, जुलै 2016 – 17 मध्ये 15 हजार 340, तर ऑगस्ट मध्ये 13 हजार 582, जुलै 2017 – 18 मध्ये 17 हजार 680 तर ऑगस्ट मध्ये 17 हजार 30, जुलै 2018- 19 मध्ये 18 हजार 398 तर ऑगस्ट मध्ये 16 हजार 809 तर यंदा जुलै अखेरीस धरणे भरली असताना 19 हजार 166 तर ऑगस्ट मध्ये 20 हजार 872 टँकरच्या फेऱ्या झाल्या आहेत.

त्यामुळे कितीही पाऊस झाला असला तरी पुण्यात भर पावसाळ्यात टँकरची संख्या वाढत चालली आहे. ही संख्या वाढत असताना महापालिकेच्या टँकरच्या फेऱ्या महिन्याला जेमतेम 2 हजार 327 पर्यंत पोहोचल्या असल्यातरी खासगी टॅन्कवर चालकांच्या फेऱ्या 6 हजार 174 वरून (ऑगस्ट 2015- 16) 17 हजार 641 हजार (ऑगस्ट 2019) अर्थात 200 टक्के वाढल्या आहेत. खासगी टँकर चालकांकडून अव्वाच्या सव्वा दर लावून पाणी विकले जाते. विशेष असे की हे विकतचे पाणी घेणाऱ्या या उच्चभ्रू सोसायट्या आहेत. केवळ पाण्यासाठी सोसायट्या दरवर्षी लाखो रुपये खर्च करत असल्याचे स्मार्ट पुण्यात पाहायला मिळत आहे. यामागे मोठी लॉबी कार्यरत असून आवाज उठवायचा कोणी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

Visit : Policenama.com