धक्कादायक… पुण्यात आय टी अभियंत्याने वाहतूक पोलिसावरच  घातली गाडी 

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन

वाहतूक पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचे  प्रमाण वाढत चालले आहे. आता पुण्यात अशा प्रकारची घटना घडली आहे. सिग्नल तोडून पाळणाऱ्या आयटी आभियंत्याकडून वाहतुक पोलिसांच्या अंगावर चारचाकी  गाडी घालण्याचा धक्कादायक प्रकार  शिवाजीनगर भागातील शिवाजी पुतळा येथील चौकात बुधवारी दुपारी घडला. सुदैवाने यात वाहतूक पोलिसाला इजा झाली नाही.
[amazon_link asins=’B0789G2XWZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6b054497-8b72-11e8-a6fc-db73be26acdd’]

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शिवाजीनगर भागातील शिवाजी पुतळा येथील चौकात एका आयटी अभियंत्याने सिग्नल तोडाला. त्यावेळी ड्युटी करीत असलेल्या वाहतूक पोलिसांनी त्याच्याकडे लायसन्सबाबत विचारणा केली. तेव्हा मात्र त्याने पोलिसांशीच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावेळी मागून आलेल्या काही वाहनचालकांनी थांबून हा चालक काही वेळापासून वेडी वाकडी गाडी चालवत असल्याचे सांगितले. जमा झालेल्या लोकांचा राग अनावर झाल्यामुळे त्यांनी त्या वाहनचाकाला मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यामुळे वाहतूक पोलीस मध्यस्ती करून त्याला बाजूला घेऊन गेले. उलट त्या व्यक्तीने वाहतूक पोलिसांशी धक्काबुक्की केली. तसेच तो आपली गाडी घेऊन पळून जाऊ लागला. त्यानंतर वाहतूक पोलिसाने त्याला रोखण्याचा प्रयत्न  केला असता पोलिसांचा हात गाडीच्या खिडकीच्या काचेत अडकला. तरी देखील वाहन चालकाने गाडी वाहतूक पोलिसांच्या अंगावर घातली. दरम्यान संध्याकाळपर्यंत वाहनचालकावर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात अाला नव्हता.

Loading...
You might also like