पुण्यातील ओझरमध्ये 15 तलवारीसह एकजण जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक व ओतूर पोलीस स्टेशन यांनी सयुक्त कारवाई करून एका व्यक्तीला अटक करून त्याच्याकडून १५ तलवारी जप्त केल्या आहेत. ही कारवाई आज (सोमवारी) ओतूर येथील कारखाना फाट्यावर सापळा रचून करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर यापूर्वी ही गुन्हे दाखल आहेत. सोमनाथ राजाराम साळुंके (वय-२६ रा. धनगरवाडी, ता. जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक व ओतूर पोलीस स्टेशन यांनी सयुक्त कारवाई करून ओझर येथून सोमनाथ साळुंके याला १५ तलवारी सह सापळा रचून अटक करण्यात आली. सोमनाथ साळुंके वर यापूर्वी गुन्हे दाखल असुन तो कारखाना फाट्यावरून ओतूरच्या दिशेने दुचाकीवरून निघाला होता. तो दुचाकीवर पांढर्‍या गोणीमध्ये 15 तलवारी बांधून निघाला आहे अशी माहिती पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीवरून ओतूर पोलिसांची मदत घेऊन त्याला ओझर येथे अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक ओतूर पोलीस स्टेशन रमेश खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहायक फौजदार विश्वास खरात, सुनील ढगारे, राजु पवार, किरण कुसाळकर, मोसिन शेख यांच्या पथकाने केली.
आरोग्यविषयक वृत्त