पुण्यात ‘स्वाइन फ्लू’ने आतापर्यंत २० जणांचा मृत्यू,  रूग्णांची संख्या १०९ वर

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन

पुण्यात ‘स्वाइन फ्लू’ची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. आतापर्यंत या रोगाने २० रूग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरुन ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. गणेशोत्सवानिमित्त शहरात गेले काही दिवस मोठय़ा संख्यने नागरिक बाहेरुन आले आहेत. स्वाइन फ्लूचा संसर्ग पसरु नये यासाठी संसर्गजन्य आजार झालेल्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2af2fd51-bef6-11e8-8d0d-55202fa530c1′]

दरम्यान, शहरातील स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या १०९ झाली आहे. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये ७२ रुग्ण जनरल वॉर्डमध्ये तर ३७  रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या नवीन दहा रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. शनिवारी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुमारे ३४२५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एकशे अठ्ठेचाळीस रुग्णांना टॅमिफ्लू हे औषध देण्यात आले. पाच रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यांपैकी दोन रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

नोटाबंदीने अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला : विखे

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, वातावरणात सातत्याने होणारे बदल हे स्वाइन फ्लूचा संसर्ग वेगाने पसरण्यासाठी हातभार लावतात. गेल्या दोन तीन दिवसात शहरात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. कडक उन आणि पहाटे थंडी पडताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3e86e49c-bef6-11e8-964d-ef7d0a840699′]

२०१८ मध्ये स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दोनशे दोनवर गेली असून वर्षभरामध्ये एकोणसत्तर रुग्ण उपचारांअंती पूर्ण बरे झाले. वर्षभरामध्ये ६ लाख ५५ हजार सहाशे एकोणचाळीस रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी ८ हजार चारशे बावन्न रुग्णांना टॅमिफ्लू हे औषध देण्यात आले आहे.

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल