रेल्वेचं ‘मिशन १००’ : दिल्‍ली ते मुंबई, हावडा ‘ट्रॅक’वरून जाणार्‍या रेल्वे १६० च्या ‘स्पीड’ने धावणार, ५ तासांनी लवकर पोहचणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेने पुढील चार वर्षात मुंबई ते हावडा हे अंतर ५ तासांनी कमी करण्याचे लक्ष्य निर्धारीत केले आहे. या रेल्वे मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी १४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.

ही योजना रेल्वेच्या वतीने प्लॅन – १०० दिवसांच्या अंतर्गत कॅबिनेट कमिटीकडे आर्थिक व्यवहारांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. ह्या प्रस्तावाची औपचारिकता ३१ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करून काम सुरु करण्यात येणार आहे. रेल्वे विभागाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांवर १०० दिवसांची योजना आखली आहे.

दिल्ली-हावडा आणि दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावरील प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी रेल्वेची जास्तीत जास्त गती १६० km /h पर्यंत वाढवण्याचा रेल्वे विभागाचा उद्देश आहे. मात्र यासाठी, दोन्ही मार्गांवर रेल्वेचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता आहे. प्रस्तावानुसार, दिल्ली-हावडा दरम्यान १५२५ किलोमीटरच्या मार्गासाठी १५,६८४ कोटी रुपये आणि दिल्ली-मुंबई दरम्यान १,४८३ किमी मार्गासाठी ६,८०६ कोटी रुपये अंदाजे खर्च निश्चित करण्यात आला आहे.

योजनेची वैशिष्ट्ये –

एकूण रेल्वे प्रवाशांपैकी ३० % रेल्वे प्रवाशी या मार्गाने प्रवास करतात.
या मार्गावरून जवळपास २० % मालवाहतूक चालते.
दिल्ली ते हावडा पर्यंत प्रवास करण्यासाठी १७ तास वेळ लागतो.
दिल्लीहून मुंबईला जाण्यासाठी १५. ५ तास तास वेळ लागतो.

प्लॅन -१०० अंतर्गत राबवण्यात येणारी धोरणे-

-प्रवाशांना तिकीट सब्सिडी देण्यासाठी चालविण्यासाठी ‘गिव इट अप’ ‘ मोहीम राबवण्यात येईल.

-महत्वाच्या पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या मार्गांवर देखरेख करण्याची जबाबदारी खाजगी क्षेत्रांना देण्यात येईल.

-धुके आणि वेगामुळे होणाऱ्या अपघाताच्या घटना टाळण्यासाठी रेल्वेमार्गावर डिजिटल कॉरिडॉर उभारण्यात येईल.

-उर्वरित ४८८२ रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

-२०२३ पर्यंत २५६८ रेल्वे क्रॉसिंग रद्द करण्यासाठी सरकारकडे ५० हजार कोटी मागण्यात येतील.

-५० रेल्वे स्थानक आणि रेल्वे बोर्ड यांचा पुनर्विकास करण्यात येईल.

-रेल्वे सिग्नल सिस्टम आणि इतर तंत्रे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे बदलली जातील.

आरोग्यविषयक वृत्त –

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा