‘रामायण’मध्ये ‘राम-सीते’च्या मिलनात विलन बनला होता ‘डॉगी’, घ्यावे लागले होते 7 ते 8 रिटेक ! ‘अशी’ केली शुटींग (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –रामानंद सागर यांची डीडीवरील रामायण ही मालिका संपली आहे. तरीही मालिकेशी संबंधित अनेक किस्से समोर येताना दिसत आहे. अलीकडेच रामायणमधील लक्ष्मण सुनील लहरी यांनी शुटींगचा एक मजेदार किस्सा सांगितला आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

सुनील लहरी यांनी ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि चौथ्या एपिसोडवेळी काय काय झालं होतं हे सांगितलं आहे. यात त्यांनी तीन किस्से सांगितले आहेत. पहिला किस्सा सांगताना सुनील सांगतात, “जेव्हा आम्ही महाराज जनक यांना नमन करायचो तेव्हा माझा मुकुट सारखाच खाली पडत होता. नंतर त्याला टाईट करण्यात आला.”

दुसरा किस्सा सांगताना सुनील म्हणतात, “राम आणि सीतेचं मिलन एका बगीचात होणार होतं. परंतु मध्येच तिथं एक कुत्र यायचं ज्यामुळं सीन खराब होत होता. 7 ते 8 वेळा असंच झालं. नंतर काही लोकांना लक्षे ठेवायला सांगून सीन ठिक करण्यात आला.”

तिसरा किस्सा त्यांनी सांगितला की, जेव्हा विश्वमित्राचे पाय दाबण्याचा सीन करायचो तेव्हा त्या कलाकाराला खूप मजा येत होती. तो खूप वेळ घ्यायचा. मग मी त्याच्या पायाला गुदगुल्या करायचो.

सुनील लहरी असंही म्हणाले की, ते पाचव्या एपिसोडबद्दलही सांगणार आहेत. कारण यानंतर त्यांच्यासोबत खूप मोठा अपघात झाला होता.