सांगलीत आज काँग्रेसचा सरकारविरोधात जनसंघर्ष

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन 

काँग्रेसने केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या निष्क्रीय कारभाराविरोधात जनसंघर्ष यात्रा सुरू केली असून ही यात्रा शनिवारी सांगलीत दाखल होणार आहे. याविषयी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यातून सुरू  झालेली जनसंघर्ष यात्रा सांगलीत सायंकाळी पोहोचणार आहे. कोल्हापूर रस्त्यावर यात्रेचे सायंकाळी ६ वाजता स्वागत होणार असून काँग्रेस कमिटीसमोर जाहीर सभा होईल.

[amazon_link asins=’B07952XGV9,B01MU3UEMN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e34510b5-adb5-11e8-a1e7-e3ade10a1b9f’]

पृथ्वीराज पाटील म्हणाले, या यात्रेचे सायंकाळी ६ वाजता कोल्हापूर रस्त्यावर शंभरफुटी चौकात मी, युवक काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष  आमदार डॉ. विश्‍वजित कदम, नेत्या जयश्री पाटील, प्रतिक पाटील, विशाल पाटील, शैलजा पाटील यांच्यासह सर्व विभागांचे पदाधिकारी, कार्यकर्ते स्वागत करणार आहोत. यात्रा तेथून बसस्थानक, शिवाजी महाराज पुतळा, राजवाडा चौक, काँग्रेस कमिटी चौकात येणार आहे. तेथे जाहीर सभा होईल. त्यानंतर रविवार (दि. २) सकाळी साडेनऊ वाजता वसंतदादा पाटील समाधीस्थळाचे दर्शन घेऊन यात्रा मिरजेकडे रवाना होणार आहे. मिरजेतून कळंबी, शिरढोण, कवठेमहांकाळ, डफळापूर, जत, भिवघाट, विटा, कडेपूर, वांगी, देवराष्ट्रे, सोनहिरा साखर कारखाना परिसर, कडेगावमार्गे कराडकडे जाणार आहे.

व्यापाऱ्यांसाठी तुरूंगवासाचा कायदा केलेला नाही : सदाभाऊ खोत

२ सप्टेंबररोजी यात्रा जिल्हाभर फिरणार आहे. जत, कडेगाव येथे जाहीर सभा होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराने जनता हैराण झाली आहे. नोटबंदी, जीएसटी निर्णयामुळे जनतेचे हाल झाले. मराठा व धनगर समाजाला आरक्षणासाठी  झुलवत ठेवले  आहे. या विरोधात देश व राज्यपातळीवर संतापाची लाट आहे. ती पुन्हा परिवर्तनाची आणि भाजपमुक्तीची नांदीच आहे. जनसंघर्षाची सुरुवात कोल्हापुरातून झाली आहे. या यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मलिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह वरिष्ठ नेते, खासदार व सर्व आमदार सहभागी झाले आहेत.