शिक्रापुरमध्ये भाजपा सेवा सप्ताह अंतर्गत आरोग्य शिबीर,औषधी वनस्पतींचे वाटप

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी आणि युवा मोर्चाच्या माध्यमातून शिक्रापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या सेवा सप्ताह अंतर्गत कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष जयेश शिंदे, रोहित खैरे, बाबासाहेब दरेकर यांच्या माध्यमातून आरोग्य शिबीर आणि औषधी वनस्पतींचे वाटप करण्यात आले.यावेळी आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सुमारे 300 रुग्णांची आरोग्य तपासणी करुन घेतली तर नेत्र चिकित्सा करुन गरजूंना चष्मे वाटप करण्यात आले .तर तुळस ,कोरपड,गवती चहा ओवा अशा ७०० औषधी वनस्पतींचे वाटप देखील करण्यात आले.

यावेळी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी सांगितले की कोरोना महामारीत महाविकास आघाडी सरकारने गोर गरीब जनतेच्या आरोग्याची जबाबदारी झटकली असून माझे कुटुंब माझी जबाबदारी या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचं मरण स्वस्त केलं. तर मुख्यमंत्री घरातच क्वारंटाइन असून ते मातोश्री सोडत नाहीत. उपमुख्यमंत्री फक्‍त पुणे आणि बारामतीमध्ये फिरत आहेत. राज्यातील इतर मंत्रीदेखील फिरत नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडले आहे.

सरकारने सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. करोना महासंकटात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कुठे गेले? चारा छावण्या उभ्या करायच्या असत्या तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि साखर कारखानदार सर्वात पुढे असते. अशा टोला देखील भाजपचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी राष्ट्रवादीला लावला.

राज्याचे आरोग्यमंत्री रस्त्याने जाता असताना शिरूर मध्ये थांबले असता त्यावेळी आरोग्य मंञ्याना शिरूर तालुक्‍यात महात्मा फुले जन आरोग्य योजनाच कार्यान्वित नाही,हे समजात धक्का बसला असे म्हणतात .तालुक्यात रुग्णांना बेड उपलब्ध नाही, हॉस्पिटल मिळत नाही, व्हेंटिलेटर नाही अशा वेळी तालुक्‍याचे कार्यक्षम म्हणवून घेणारे तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी काय करतात? असा टोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी नाव न घेता आमदारांना लावला.

यावेळी जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष दादापाटिल फराटे ,प्रदिप कंद, गणेश ताठे, अनुप मोरे, गणेश दगडे,सुदर्शन चौधरी,संजय पाचंगे, बाळासाहेब चव्हाण, गणेश कुटे, संदीप सातव, शाम गावडे यांच्या सह नितीन गव्हाणे जयेश शिंदे ,रोहीत खैरे अदि सह मान्यवर उपस्थित होते