शिक्रापुरमध्ये राष्ट्रवादीची ‘सरसी’ तर बांदलांना धक्का !

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर तालुक्‍यात राजकीयदृष्ट्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आला असून प्रस्थापित बांदल गटाला मोठा धक्का देत राष्ट्रवादीच्या मांढरे-करंजे-जकाते गटाने निवडणूकीत बाजी मारली आहे.

या निवडणुकात बांदल गटाकडून माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांचासह बांदलांचा पुतण्या निखील प्रतापराव बांदल यांना उमेदवारी देवून निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, सासवडे-बांदल या दोघांनाही शिक्रापुर ग्रामस्थांनी नाकारल्याने पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

यामध्ये बांदल गटाला सर्वात मोठा धक्का देत वॉर्ड नं. 1 मधील माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांचा पराभव करंजे कुटुंबातील उच्चशिक्षित उद्योजक मयूर करंजे यांनी केला तर बांदलांचे पुतणे निखिल बांदल यांचा पराभव सुभाष खैरे यांनी केला. याच बरोबर भाजपचे नेते राजाभाऊ मांढरे यांच्या पत्नी भारती राजाभाऊ मांढरे यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले.