Coronavirus : सोलापूरात 24 तासात ‘कोरोना’चे 28 नवे रुग्ण तर 6 जणांचा मृत्यू, बधितांची संख्या 516 वर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूरमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आज (शुक्रवार) दिवसभरात 28 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. तर कोरोनाबाधित 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 180 जणाचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैखी 152 अहवाल निगेटिव्ह आले आहे. सोलापूरमध्ये 28 नवे रुग्ण आढळून आल्याने सोलापूरमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 516 झाली आहे. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

अद्याप १५९ अहवाल प्रलंबित असून आज पाचेगाव, सांगोला, सोलापूर शहरातील कुर्बान हुसेन नगर, तेलंगी पाच्छा पेठ, देगाव रोडवरील सलगर वस्ती, भवानी पेठेतील मराठा वस्ती, जुळे सोलापूरातील सिद्धेश्वर नगर परिसरातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आज 6 जणांच्या मृत्यूमुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 40 वर पोहचली आहे. सध्या 252 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

आज मृत रुग्णामध्ये सांगोला तालुक्यातील पाचेगांव परिसरातील 64 वर्षीय व्यक्ती असून त्यांना 18 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांचा 20 मे रोजी मृत्यू झाला होता. त्यांचा कोवीड रिपोर्ट पॉझीटीव्ह आज आला आहे.

दुसरे मृत रुग्ण कुर्बान हुसेन नगर परिसरातील 58 वर्षीय व्यक्ती असून त्यांना 18 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा 21 मे रोजी मृत्यू झाला होता त्यांचा कोवीड रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे.

तिसरे मृत रुग्ण तेलंगी पाच्छा पेठ परिसरातील 72 वर्षीय व्यक्ती असून त्यांना 17 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा 21 मे रोजी मृत्यू झाला होता. त्यांचा कोवीड रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे.

चौथे मृत रुग्ण सलगर वस्ती देगांव परिसरातील 55 वर्षीय व्यक्ती असून त्यांना 18 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा 20 मे रोजी मृत्यू झाला होता. त्यांचा कोवीड रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे.

पाचवे मृत रुग्ण मराठा वस्ती, भवानी पेठ परिसरातील 58 वर्षीय महिला असून त्यांना 16 मे रोजी मार्कंडेय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा 20 मे रोजी मृत्यू झाला होता. त्यांचा कोवीड रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे.

सहावे मृत रुग्ण सिध्देश्‍वर नगर, जुळे सोलापूर परिसरातील 46 वर्षीय व्यक्ती असून त्यांना 14 मे रोजी अश्‍विनी रुग्णालय ग्रामीण कुंभारी येथे दाखल करण्यात आले होते. त्यांचा 21 मे रोजी मृत्यू झाला होता. त्यांचा कोवीड रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे.