सोलापूरात आजही 21 नवे रुग्ण, ‘कोरोना’ बाधितांची संख्या 364 वर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन-  सोलापूर शहरात आज शनिवार रोजी 21 नविन कोरोना बाधिक रुग्णांची वाढ झाली आहे. दरम्यान शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 364 असून यामधिल 190 जण उपचार घेत आहेत तर 150 जण बरे झाले अशी माहिती सोलापूचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी आज दिली आहे.

आज सायंकाळी 7 वाजता जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सोलापूरातील कोरोना बाधितांची संख्या 364 झाली आहे. आज एका दिवसात 234 अहवाल प्राप्त झाले त्यात 213 निगेटिव्ह तर 21 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यात 9 पुरूष 12 महिलांचा समावेश आहे. आत्तापर्यंत मृतांची संख्या 24 आहे.

एकूण कोरोना चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 4106 असून त्यातील 3820 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 3456 निगेटिव्ह तर 364 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. अद्याप 286 अहवाल येणे आहेत. आज बरे झालेल्यांपैकी 37 जणांना घरी सोडण्यात आलं. ही एकूण संख्या आता 150 इतकी झाली आहे तर रूग्णालयात अद्याप 190 जणांवर उपचार सुरू आहेत.

आज पॉझिटिव्ह अहवाल आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे,शुक्रवार पेठ 1 पुरूष.अशोक चौक 1 पुरूष,1 महिला. जुना कुंभारी नाका 1 पुरूष, 1 महिला,अलकुंटे चौक 1पुरूष.लष्कर 2 पुरूष. ,न्यू पाच्छा पेठ 1 महिला. कुमठा नाका 1 पुरूष, 3 महिला.गीतानगर 1 पुरूष, 2 महिला. एकतानगर 1 महिला.साईबाबा चौक 1 पुरूष, 1 महिला.तुळशीनगर 1 महिला. नाथ संकुल सदर बझार 1 महिला.अशा प्रकारे आज मिळालेले रुग्णआहेेेत.