सोलापूरात प्रणिती शिंदे 11 हजार मतांनी पिछाडीवर, दिलीप माने आघाडीवर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर मध्य मतदारसंघामध्ये यंदा निवडणूकीत जोरदार रस्सीखेच दिसत आहे, राष्ट्रवादीच्या प्रणिती शिंदे 11 हजार मतांनी पिछाडीवर आहे. सध्या त्यांच्या विरोधातील शिवसेनेचे प्रबळ उमेदवार दिलीप माने यंदा आघाडीवर आहेत.

मागील दोन विधानसभा प्रणिती शिंदे आमदार राहिल्या आहेत, परंतू यंदाचा जनमताचा कौल त्यांच्या विरोधात जाताना दिसत आहे. शिवसेनेचे दिलीप माने चांगल्या मताने आघाडीवर आहे. यंदाच्या निवडणूकीत 55.47 टक्के मतदान झाले होते. मात्र प्रणिती शिंदे सध्या 11 हजार मतांनी पिछाडीवर गेल्याचे दिसत आहे.

पहिल्या फेरीअखेर प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेतली होती. त्यांना 2400 मतं मिळाली होती. एमआयमएमच्या फारूख शाब्दी यांना 1800 तर दिलीप माने 1600 आणि महेश कोठेंना 1500 मत मिळाली होती. सोलापूर शहर मध्य मतदारसंघात एकूण 15पेक्षाही अधिक उमेदवार आहेत. पहिल्या फेरीअखेर आघाडी घेणाऱ्या प्रणिती शिंदे मात्र आता 11 हजार मतांनी पिछाडीवर गेल्या आहेत.

 

टीप : हा अंतिम निकाल नाही. आणखी मतमोजणी चालू असून अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत

Visit : Policenama.com