राज्यात मरण ‘स्वस्त’ झालं ! गेल्या पाच दिवसांत ६१ बळी

मुंबई : पोलीसनामा ऑलनाईन – कोठे भिंत कोसळते तर कोठे धरण फुटते. आठवड्यात झालेल्या दुर्देवी घटनांमुळे सामान्य लोकांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडणाऱ्या कामगारांचा समावेश आहे.आठवडाभरात घडलेल्या दुर्देवी घटनांमुळे कित्येक जणांचे संसार उद्धवस्त झाले. बहुतांशी घटनांना प्रशासनाचा आणि बांधकाम व्यावसायिकाचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला आहे. गेल्या तीन दिवसात सामन्यांचे ६१ बळी गेले असून हा आकडा अजूनही वाढतोच आहे.अनेकजण बेपत्ता आहेत.

रत्नागिरी (तिवरे धरण) – ११ मयत, १३ बेपत्‍ता
पुणे – २१ मयत
नाशिक – ४ मयत
मुंबई – २२ मयत
कल्याण – ३ मयत

एकूण – ६१ मयत, १३ बेपत्‍ता (धरण फुटल्यानं वाहून गेले)

तिवरे धरण दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू तर १३ जण बेपत्ता

रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसामुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले. या धरणफुटीमुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे तर १३ जण बेपत्ता झाले आहेत. धरणाच्या दुरुस्तीसाठी वारंवार प्रस्ताव देऊनही शासनाने निधी न दिल्याने हे धरण फुटल्याची माहिती समोर आली आहे. धरणाला भगदाड पडल्याची तक्रार ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली होती पण प्रशासनाने गावकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्देवी घटना घडली.

मंगळवार ठरला ‘घातवार’, मुंबई-पुण्यात भिंत कोसळून ३१ ठार

मुसळधार पावसामुळे मालाड पूर्व परिसरात असलेल्या झोपड्पट्टीवर भिंत कोसळून या दुर्घनेत २२ जणांचा मृत्यू झाला तर ७५ जण जखमी झाले आहेत. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली. त्याचवेळी पुण्यातील आंबेगाव येथील सिंहगड इंस्टिट्युसच्या कॅम्पसची सीमा भिंत कोसळून ६ कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तसेच कल्याण येथे उर्दू शाळेची भिंत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला.

पुण्यातील कोंढव्यात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू

पुण्यातील कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून १५जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल आणि स्थानिकांकडून बचावकार्य सुरु असून तिघांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले.पुण्यातील बडा तालाब मस्जिद परिसरात आल्कन स्टायलस या सोसायटीच्या कंपाऊंड वॉलला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या. पावसामुळे सोसायटीची कंपाऊंड वॉल खचून कामगारांच्या कच्च्या घरांवर कोसळली. त्यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला.

नाशिकमध्ये पाण्याची टाकी कोसळून ४ ठार

मुंबई- पुणे पाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील दुर्देवी घटना घडली आहे. येथे देखील बांधकाम व्यावसायिकाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. नाशिक येथे २ जुलैला सम्राट ग्रुपच्या अपना ग्रुप प्रोजेक्ट्मध्ये बांधकाम सुरु असताना टाकी फुटली आणि यामुळे ४ कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला.

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

बाळासाहेब आंबेडकर यांची मुंबईत आज पत्रकार परिषद ,विधानसभेबाबत करणार मोठा खुलासा

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती