SSR Case : सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी रियानं एका खास नंबरवर केली एक तास दिर्घ ‘बातचीत’

मुुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूत केसमध्ये प्रत्येक दिवशी नवी माहिती समोर येत आहे. या केसचा तपास चार वेगवेगळ्या एजन्सीज करत आहेत – ईडी, सीबीआय, बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस. आशा आहे की, पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्ट यापैकी एका एजन्सीला तपासाची जबाबदारी देऊ शकते. दरम्यान, ईडीला रिया चक्रवर्तीच्या फोन कॉलबाबत आणखी महत्वाची माहिती मिळाली आहे. मीडिया रिपोर्टमध्ये ईडीच्या सूत्रांच्या संदर्भाने दावा करण्यात आला आहे की, ज्यादिवशी सुशांतचा मृत्यू झाला, त्याच दिवशी रियाने एका खास नंबरवर एक तासापेक्षा जास्तवेळ बातचीत केली होती. एवढेच नव्हे, तर टीव्हीवर सुशांत सिंहच्या नावाची ब्रेकिंग सुरू होती, तेव्हासुद्धा रिया या नंबरवर बोलत होती.

मृत्यूच्या दिवशी किती कॉल्स ?
सुशांतचा मृत्यू 14 जूनरोजी झाला. एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार मृत्यूच्या दिवशी रिया चक्रवर्तीला मोबाईलवर 7 कॉल्स आले. तर रियाने आपल्या फोनवरून इतरांना 9 कॉल्स केले. सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी रियाने राधिका मेहता नावाच्या महिलेशी 1 तास 36 सेकंद बातचीत केली. सुशांतच्या मृत्यूच्या 24 तास आधी आणि 24 तासनंतर रियाचे कुणाशीही इतके दिर्घ बोलणे झालेले नाही.

एक तासाची दिर्घ बातचीत
राधिका आणि रियामध्ये यादरम्यान तीनवेळा चर्चा झाली. सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी सकाळी 7 वाजून 38 मिनिटांनी राधिकाने रियाला पहिला कॉल केला, यादरम्यान दोघींमध्ये 30 मिनिटे 55 सेकंद बोलणे झाले. यानंतर 8 वाजून 8 सेकंदाने रियाने राधिका मेहताला कॉल केला. यावेळी ही चर्चा सुमारे 30 मिनिटे चालली. तिसर्‍यांदा रियाने 8 वाजून 38 मिनिटांनी पुन्हा राधिका मेहताला कॉल केला, यावेळी दोघींमध्ये 5 मिनिटे 41 सेकंदपर्यंत चर्चा झाली. ही राधिका मेहता कोण आहे, याबाबत सध्या शोध घेतला जात आहे.

सुशांत सिंहला किती कॉल
मागच्या वर्षीच्या दरम्यान रिया चक्रवर्तीने सुशांत सिंह राजपूतला केवळ 142 वेळा कॉल केला होता, तर त्याच्या स्टाफला 502 वेळा कॉल केला होता. तिने आपल्या भावाशी 800 वेळा फोनवर चर्चा केली आणि आपल्या आईशी 890 वेळा बोलणे केले. इतकेच नव्हे, सुशांतच्या सेक्रेटरीशी सुद्धा रिया बोलत होती. सूत्रांनुसार रियाने मागील एक वर्षांत सुशांतच्या सेक्रेटरीशी 148 वेळा फोनवर चर्चा केली.

रियावरील एफआयआर मुंबईत ट्रान्सफरवर उत्तर
सुशांत सिंह राजपूत केसमध्ये त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. रियाने आपल्या विरूद्ध पाटणामध्ये दाखल एफआयआर मुंबईत ट्रान्सफर करण्याची विनंती केली होती. सीबीआईने सुद्धा म्हटले होते की, या प्रकरणाशी बहुतांश बाबी मुंबईत आहेत, अशावेळी हे बिहार पोलिसांच्या तपास क्षेत्रात येत नाही. सीबीआय आणि ईडीला तपास करू द्यावा.