उद्या तळेगाव दाभाडेत शरद पवार यांच्या हस्ते शरद राव यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

तळेगाव दाभाडे येथील डॉ. राममोहन लोहिया समाजवादी विद्यापीठ, कडोलकर कॉलनी येथे शनिवार १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता दिवंगत कामगार नेते यांच्या पंचधातूच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महानगरपालिका-नगरपालिका, कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनचे कार्याध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी दिली.
शरद राव यांनी चौदा राज्यांमधील अठरा लाख कामगारांचे नेतृत्व केले. एका गरीब कामगाराच्या घरात त्यांचा जन्म झाला होता. त्यामुळे कामगारांच्या वेदनांची जाणीव मनात ठेवुनच त्यांनी कामगार संघटनेचे काम पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ केले. जेव्हा जेव्हा कामगार आंदोलनात संभ्रम निर्माण होत असे, तेव्हा शरद राव हे कामगार चळवळीला नवनिर्माणाच्या मार्गावर घेऊन जायचे. एक अभ्यासू कामगार नेते म्हणून राव हे राज्यासह देशात ओळखले जात होते.

[amazon_link asins=’B01M00W6T7,B07G9HVLRW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4f59e4ea-acf0-11e8-89a6-41b51a447723′]

शरद राव यांचे दिनांक १ सप्टेंबर, २०१६ रोजी निधन झाले. शरद राव यांचे चिरंतन स्मारक मुनिसीपल मजदूर युनियन आणि मुनिसीपल इंजिनिअर्स असोसिएशनचे नेते अ‍ॅड. सुखदेव काशिद आणि नवनाथ घाडगे यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे. तरी या कार्यक्रमास कामगारांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य महानगरपालिका-नगरपालिका, कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनने केले आहे.

‘तो’ व्हायरल मॅसेज फेक : बँका सलग आठ दिवस बंद नाहीत