निवृत्त चालकासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केले सारथ्य!

करूर: वृत्तसंस्था
मुलीच्या आयुष्यात जसा लगण झाल्यावर निरोप देतानाचा क्षण जसा भावुक असतो तसा प्रत्येक नोकरदार पुरुषांसाठी निवृत्तीचा क्षण भावुक असतो.
तामिळनाडूतील करून जिल्ह्यात देखील असा भावुक क्षण जिल्हाधिकारी कार्यालयात दिसला. करूरमध्ये नियुक्तीवर येणाऱ्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याचे ‘सारथ्य’ करणारे आणि गेले ३५ वर्ष सेवेत असलेले चालक परमशिवम यांना निवृत्तीच्या दिवशी आयोजित समारंभात अनेकांनी भेटवस्तू, शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात अनोखी भेट होती ती म्हंजे जिल्हाधिकारी अनबगजन यांनी परमसिवम यांना दिली. ही भेट दीर्घकाळ त्यांच्या स्मरणात राहील. जिल्हाधिकाऱ्यांनी परमशिवम यांना आणि कुटुंबीयांना कारमध्ये बसवले आणि ते स्वतः चालक झाले. ‘साहेबां’कडूनच हा सन्मान मिळाल्याने परमशिवम अतिशय भावूक झाले.

निरोप समारंभात जिल्हाधिकाऱ्यांनी भेट म्हणून अंगठी दिली. त्याचवेळी त्यांनी मी आज तुम्हाला घरी सोडतो असे सांगितले. हे ऐकून परमशिवम यांना आश्चर्य वाटले. इतकेच नाही तर ते परमशिवम यांच्या घरी गेले. चहा घेतला आणि काही वेळ कुटुंबीयांशी गप्पाही मारल्या.