१० राज्यासह दिल्‍लीमध्ये काँग्रेसला ‘भोपळा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीत त्सुनामी होती हे आता स्पष्ट झालेले आहे. भाजप आणि मित्र पक्षांनी जवळपास 340 जागा जिंकल्यात जमा आहे. 340 ठिकाणी एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. काही ठिकाणी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले आहे हतर काही ठिकाणचे निकाल अजून जाहिर करण्यात आलेले नाहीत. दरम्यान, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्‍तराखंड, जम्मू काश्मीर, ओडिशा, त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम आणि दिल्‍ली येथे काँग्रेसचा एकही उमेदवार निवडुन आलेला नाही. काँग्रेसला भोपळा देखील फोडता आला नसल्याने काँग्रेस भुईसपाट झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये गेल्या 3 महिन्यांपुर्वीच विधानसभेच्या निवडणुका झाली. दोन्ही राज्यात काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. सध्या दोन्ही राज्यात काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. असे असताना देखील दोन्ही राज्यात काँग्रेसला अद्याप भोपळा देखील फोडता आलेला नाही. मोदी त्सुनामीमध्ये काँग्रेसचे 5 माजी मुख्यमंत्री पराभूत झाले आहेत. त्यामध्ये अशोकराव चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, दिग्विजय सिंग, शिला दिक्षीत आणि विरप्पा मोइली यांचा समावेश आहे.