भरदिवसा चोरट्याने दुचाकी चोरली, घटना सीसीटीव्हीत कैद

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. काही दिवसांमध्य़े चोऱ्यांचे प्रमाण खुप वाढले आहे. भरदिवसा धुम स्टाईलने सोनसाखळी, दुचाकी चोरण्याचे प्रकार घडत आहेत. अशीच एक दुचाकी चोरल्याची घटना शहरातील बाजार पेठेत घडली आहे. कार्तिक अग्रवाल यांची यामहा दुचाकी (mh18/E3074) बाजारपेठेतील पार्कींग जवळून चोरट्यांनी लंपास केली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून चोरट्यांना पकडण्याचे पोलीसांसमोर मोठे आव्हान आहे.

अग्रवाल यांची गाडी बाजारपेठेतील पार्किंजवळ पार्क करण्यात आली होती. चोरट्याने आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून हॅण्डललाॅक तोडून दुचाकी लंपास केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अग्रवाल यांनी सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडियावर अपलोड केले आहेत. चोरटा व गाडी दिसल्यास सपर्क साधण्याचे आवाहन अग्रवाल यांनी केले आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या चोरट्याला पकडण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like