रुग्णवाहिका बंद आवस्थेत, गरोदर महिला व बाळांचे हाल

पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत मेहकर तालुक्यात (बुलढाणा) येणाऱ्या पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रांना २००७ मध्ये १०२ या टोल फ्री क्रमांकाच्या रुग्णवाहीका उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. मात्र, या रुग्णवाहिकांना टायर खराब झाल्याने त्या बंद आवस्थेत आहेत. यामुळे गरोदा महिला व नवजात बालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रंवर उपलब्ध करुन दिलेल्या रुग्णवाहीकेसाठी १०२ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आलेला आहे. या क्रमांकावर फोन लावल्यास गरजू रुग्णांसाठी सदर रुग्णवाहीका तात्काळ हजर होते. सुसज्ज असलेली ही रुग्णवाहिका कोणतेही शुल्क न घेता गर्भवती महिलांना रुग्णालयापर्यंत पोहोचविणे, सुटी झाल्यानंतर बाळ आणि आईला घरी पोहोचविणे आणि २ वर्षापर्यंतच्या बाळांना रुग्णालयात नेण्यासाठी मोफत सेवा देते.

मेहकर तालुक्यातील डोणगाव, देऊळगाव सार्कशा, देऊळगाव माळी, जानेफळ व कळमेश्वर ही पाच प्राथमिक आरोग्य केंद्र येतात. या पाचही केंद्रांना २००७ मध्ये १०२ टोल फ्री क्रमांकाची रुग्णवाहिका देण्यात आलेली आहे. मात्र, सुरुवातीपासून या रुग्णवाहीका शोभेच्या वस्तु ठरत आल्या आहेत. एकेकाळी चालक नसल्याने उभ्या असलेल्या रूग्णवाहिकांना कालांतराने चालक मिळाले. मात्र, आता टायर नसल्याने त्या परत उभ्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. त्यामुळे वरीष्ठांनी याकडे लक्ष तात्काळ लक्ष देवून रुग्णवाहीकांना टायर बसवून त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे..