Pune : लष्कर भागात पुलगेटजवळ युवकांनी व पोलिसांनी जेष्ठ नागरिकाला दिला मदतीचा हात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लष्कर भागात पुलगेट जवळ एका जेष्ठ नागरिकाला चक्कर आल्याने तो जागेवरच कोसळला. त्यावेळेस आकाश चव्हाण या युवकाने रुग्णवाहिका बोलावण्याचा प्रयत्न केला. परंतु रुग्णवाहिका येण्यास विलंब लागेल असे सांगण्यात आले.

त्यावेळेस आकाश चव्हाण, शॉन हॉल, सूरज कांबळे, प्रशांत कंचलवार, चैतन्य कवडे व सोलापूर बाजार पोलीस चौकीचे पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पवार व पोलीस शिपाई आबासाहेब धावडे व बांधवानी तात्काळ त्या जेष्ठ नागरिकास रिक्षा मध्ये टाकून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात हलविले. त्या रुग्णालयात तात्काळ वैद्यकीय उपचार केल्याने त्या जेष्ठ नागरिकाचे प्राण वाचले. अशा प्रकारे युवकांनी व पोलिसांनी जेष्ठ नागरिकाचे प्राण वाचविले.