home page top 1

‘या’ 5 सुंदर बायका ‘FITNESS’च्या बाबतीत आपल्या पतीलाही देताहेत ‘टक्कर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आजकाल अनेकांना वाटत असतं की आपण फिट रहावं. मग सामान्य माणून असो वा कलाकार असो किंवा मग क्रिकेटर असो सर्वांनाच फिट रहायाल आवडते. क्रिकेटपटूंबद्दल बोलायचे झाले तर बीसीसीआयने खेळाडू्ंसाठी जेव्हापासून यो यो टेस्ट सुरु केली आह तेव्हापासून भारतीय खेळांडूनीही स्वत:ला फिट ठेवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या क्रिकेटर्सच्या बायकाही याबाबतीत मागे नाहीत. अशा पाच सुंदर क्रिकेटर्सच्या बायकांबद्दल आपण माहिती घेणार आहोत ज्या फिटनेसमध्ये आपल्या पतीलाही टक्कर देतात.

1) सागरिका घाटगे
टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान आणि त्याची पत्नी सागरिका घाटगे दोघे मिळून प्रो स्पोर्ट फिट नावाची जीम चालवतात. सागरिका देखील जीममध्ये घाम गाळताना दिसत असते.
Sagarika Ghatge

2) हेजल कीच
टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेजल कीच दोघेही आपल्या फिटनेसला घेऊन खूपच जागरुक आहेत. दोघेही तासनतास जीममध्ये वेळ घालवत असतात. हेजल ही बॉलिवूड अभिनेत्री आहे.
Hejal kitch

3) साक्षी धोनी
टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनी आपल्या पतीला फिटनेसमध्ये जोरदार टक्कर देताना दिसत आहे. फिटनेसच्या बाबतीत धोनीही पुढे आहे. धोनी ज्येष्ठ खेळाडूंमध्ये जरी येत असेल तरी धावत रण करण्यात धोनीचे जे रेकॉर्ड आहे त्यात धोनी टॉप खेळाडूंपैकी एक आहे.

Sakshi Dhoni

4) दीपिका पल्लीकल
विकेट कीपर फलंदाज दिनेश कार्तिकची पत्नी दीपिका पल्लीकल भारताची स्क्वॅश खेळाडू आहे. दोघेही फिटनेसला घेऊन खूपच जागरूक आहेत.

Deepika Pallikal

5) आयना धवन
टीम इंडियाचा गब्बर शिखर धवनची पत्नी ही एक बॉक्सर आहे. आयशा आपल्या पतीसोबतच इतर क्रिकेटरला फिटनेसमध्ये मात देत आहे.

Aina Dhawan

Loading...
You might also like