सुशांत सिंह रजपूत मृत्यू प्रकरण : दिशाचं नाव घेतल्यानं तिचे वडील भडकले, पोलिसात तक्रार

पोलिसनामा ऑनलाईन, मुंबई, दि. 5 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह रजपूत मृत्यू प्रकरणात दिशाचे नाव घेतल्याने तिचे वडील भडकले आहेत. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत देखील तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता सुशांत सिंह रजपूत मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण लागणार असल्याचे समजत आहे.

अभिनेता सुशांत सिंह रजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. अभिनेता सुशांत सिंह रजपूतच्या आत्महत्येला महिना उलटला तरी त्याने आत्महत्या केली की हि हत्या आहे? हे अद्याप पोलिस तपासातून स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणातून आता दररोज नव्या गोष्टी समोर येत आहेत. यात आता त्याची माजी व्यवस्थापिका दिशा सालियन हिचे नाव घेतले जात आहे. दिशा सालियन हिने देखील आत्महत्या केली नाही.तिची हत्या झाल्याचा दावा काही राजकीय नेत्यांकडून केला जातोय. या प्रकरणात आता दिशाचे वडील समोर आलेत. त्यांनी सुशांत सिंह रजपूतच्या प्रकरणात दिशाचे नाव घेतल्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सुशांत सिंह रजपूतची माजी व्यवस्थापिका दिशा हिचा मृत्यू सुशांतच्या मृत्यूसोबत जोडून पाहिला जातोय. या कारणाने पोलीस आणि मीडिया सतत दिशाच्या कुटुंबीयांशी संपर्क करीत आहेत. त्यामुळे याबाबत दिशाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, प्रसारमाध्यमातील लोक ज्याप्रमाणे त्यांना त्रास देत आहे. त्यांच्या मुलीबाबत खोटी बातमी, माहिती पसरवत आहेत. यामुळे सुशांत सिंह रजपूतच्या प्रकरणावर परिणाम होईल. शिवाय सालियन यांच्या कुटुंबीयांनाही याचा त्रास होत आहे.

सुशांतचे त्याच्या कुटुंबीयांशी पटायचे नाही. तसेच सुशांतच्या बहिणीचे पती ओ. पी. सिंग यांच्यासोबत देखील सुशांतचे अजिबातच पटायचे नाही. अशी माहितीसमोर मुंबई पोलिसांनी दिलीय. सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणावरून राजकारण देखील तापलंय.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like