Coronavirus : ‘तबलिगी’ जमातीशी संबंधित 960 विदेशींना केलं ‘ब्लॅकलिस्ट’, टुरिस्ट व्हिसा रद्द : गृह मंत्रालय

वृत्तसंस्था – तबलिगी जमातीशी संबंधित 960 विदेशी नागरिकांचा टुरिस्ट व्हिसा रद्द करण्यात आल्याची माहिती गृह मंत्रालयानं दिली आहे. तबलिगी जमातच्या कार्यात त्यांचा संबंध आढळल्यानं त्यांचें व्हिसा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, मार्च महिन्यात दिल्लीतील निझामुद्दीन येथे तबलिगी जमातनं मोठा कार्यक्रम घेतला होता. त्यामध्य देशातील हजारो जण सहभागी झाले होते. त्यापैकी 9000 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.


महाराष्ट्रातून या कार्यक्रमासाठी 1400 जणांनी हजेरी लावली होती. त्यापैकी 1300 जणांना क्वारंटाईन करण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, गृह मंत्रालयानं कठोर पावले उचलत तबलिगी जमातीच्या कार्यात सक्रिय असणार्‍या 960 विदेशींचे टुरिस्ट व्हिसा रद्द केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत जमातीच्या कार्यक्रम सहभागी झालेल्यांपैकी 400 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.