पोटच्या मुलाच्या घरात ‘आई-वडील’ काढत होते पाणी पिऊन दिवस

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – वडील सरकारी नोकरीत असताना मुलगा आणि सुनेकडून आई – वडीकांचा चांगला सांभाळ झाला. वडिलांची सेवानिवृत्तीची रक्कम येईपर्यंत सर्व काही अलबेल होते, गोड बोलून राहते घर आणि ती रक्कम स्वतःच्या नावावर करून घेतली आणि मुलाने व सुनेने विश्वास बसणार नाही असे कृत्य केले. पोटच्या मुलाने आजाराशी सामना करत पडलेल्या बापाला मारहाण केली, सुनेने सासऱ्याला मारून टाकायला सांगितले. आईने कुठेही बोलू नये म्हणून चाकूचा धाक दाखवला जात होता. तर मुलगा आणि सून बाहेर गेल्यानंतर ते परत येईपर्यंत दोघेही काढत होते पाणी पिऊन दिवस…

हे सर्व काही कोणत्या सिनेमातील काल्पनिक ‘स्टोरी’ वाटत असेल तर तसा गैरसमज करून घेऊ नका. कारण हा प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात घडला आहे. या प्रकरणी पीडित ७१ वर्षीय आईने फिर्याद दिली आहे. तर मुलगा आणि सुने विरुद्ध पोलिसांनी ५०६ (२), ३२३, ५०४ सह आई-वडिलांचा व वरिष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ चे कलम २४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

मुलगा नरेंद्र शशीमोहन नवले (४५) आणि सून पल्लवी नरेंद्र नवले (४०, दोघे रा. मनीष गार्डन, उद्योमनगर, पिंपरी) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर सुमन नवले (७१) यांनी फिर्याद दिली आहे.

संतापजनक… शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार, विद्यार्थीनीला गेले दिवस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शशीमोहन हे सरकारी नोकरीत होते. ते सेवा निवृत्त झाले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांना आजार सुरू झाला. त्यामुळे ते झोपून होते. ते झोपून असताना मुलगा नरेंद्र याने त्यांना हाताने मारहाण केली. त्यावेळी सून पल्लवी ही मारून टाका, नुसते बसून खातात असे म्हणून पती नरेंद्र याला प्रबळ ताकद देत होती. याबाबत कोठेही बोलू नये म्हणून आईला चाकूचा धाक दाखवून धमकावले जात होते. बाहेर जाताना वृद्ध आई वडिलांना कोंडून बाहेरून कुलूप लावले जात होते. ते परत येईपर्यंत दोघेही पाणी पिऊन दिवस काढत होते.

तीन महिन्यापूर्वी शशीमोहन यांचे निधन झाले. तत्पुर्वी नरेंद्र याने ते घर स्वतःच्या नावावर करून घेतले. तर सेवा निवृत्तीची रक्कम सुनेने आपल्या बँक खात्यात जमा करून घेतली. वडील गेल्यानंतर मुलगा आणि सुनेने पुन्हा त्रास द्यायला सुरूवात केली. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुलगा आणि सुनेने जबरदस्तीने घरातून बाहेर काढले. हतबल झालेली आई पोलीस ठाण्यात आली. त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी माहिती ऐकून लगेच गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.