क्रिस्टल अग्निकांड प्रकरणी सुपारीवालाला २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी 

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन
क्रिस्टल अग्निकांडप्रकरणी दोष आढळलेला इमारतीचा बिल्डर सुपारीवाला याला 27 आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परळमध्ये असणाऱ्या क्रिस्टल टाॅवरमध्ये लागलेल्या आगीत चाैघांचा मृत्यू झाला आहे. इमारत बांधकाम प्रकरणी बिल्डरचा गलथान प्रकार समोर आला आहे.
[amazon_link asins=’B07418TNB1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’87ca9282-a6c8-11e8-9fa1-8bb4882e2a74′]
सदर इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र म्हणजेच आॅक्युपेशन सर्टिफिकेट किंवा अोसीच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढेच नाही तर अग्निशमन यंत्रणा बंद ठेवल्याप्रकरणी बिल्डर सुपारीवाला याला पोलिासांनी बेड्या ठोकल्या आहेत. आगीच्या घटने दरम्यान धुराने गुदमरुन चाैघांचा मृत्यू झाला. त्यापैकी लिफ्टनं खाली उतरण्याचा प्रयत्न करत असताना त्यात दोघांचा मृत्यू झाला. तर 16 जणांवर केईएममध्ये उपचार सुरू आहेत.