जळगावमधील तरुण एटीएसच्या ताब्यात

यावल : पोलीसनामा ऑनलाईन 

एटीएसच्या पथकाने जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील साकळी गावातून वासुदेव सुर्यवंशी या तरुणास ताब्यात घेतले आहे. त्याच्या घराची झडती घेतली असता काही संशयास्पद सीडीसह काही वस्तु ताब्यात घेतल्या आहेत. दुपारी अचानक केलेल्या या कारवाईमुळे गावात खळबळ उडाली आहे. ताब्यात घेतलेला तरुण सनातनशी संबधित असून त्याचा दाभोलकर हत्याकांडाशी संबंध असल्याची चर्चा गावात सुरू होती.

[amazon_link asins=’B01N4J3WAE,B0734VLDTC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’67acc099-b25c-11e8-bab3-f3c094b6260d’]

यावल तालुक्यातील साकळी या गावात एटीएसची दोन पथके दाखल झाली होती. या पथकाने गॅरेजमध्ये काम करणाऱ्या वासुदेव सूर्यवंशी याच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले. एक पथक वासुदेवला ताब्यात घेवून तात्काळ नाशिककडे रवाना झाले. तर दुसऱ्या वाहनातील पथकाने वासुदेव याच्या घराची तीन तास झडती घेतली, अशी माहिती गावातील लोकांनी दिली. सूर्यवंशी हा मुक्ताईनगरातील कर्की या गावातील मूळ रहिवासी आहे. वडिलांचा मृत्यू झाल्यानतंर तो साकळी येथे मामाच्या गावी राहण्यासाठी आला होता. त्याच्या घर झडतीमधून संशयास्पद साहित्य आणि सीडी देखील मिळाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या कारवाईविषयी गोपनीयता पाळत पथकाने माहिती देण्यास नकार दिला.

जाहीरात 

वासुदेव सूर्यवंशी याच्या घरातून झडतीदरम्यान सनातनचे साहित्य, पुस्तके, व्हिडिओ सीडी व काही कागदपत्रे आढळली. हे साहित्य पथकाने ताब्यात घेतले. दरम्यान, सूर्यवंशीला नाशिक येथे हलविण्यात आले असून त्यास चौकशीसाठी मुंबई येथे देखील नेण्याची शक्यता आहे.उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच विमानातून उतरणार सिंधुदुर्गात