दौंडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या  प्रतिकात्मक पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून निषेध

दौंड:पोलीसनामा अाॅनलाईन

दुधाची दरवाढ करण्यासाठी आज गुरुवारी सकाळी ११ वाजता पारगाव येथे दौंडमधील शेतकऱ्यांनी एकत्र येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून राज्य सरकारचा जाहीर निषेध केला. या आंदोलनावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते पोपटभाई ताकवणे, अशोक फरगडे, माजी सरपंच सुरेश ताकवणे, दत्ता आल्हाट,किसनराव जगदाळे, राजाभाऊ बोत्रे, विश्वास ताकवणे, स्वामी शेळके, इत्यादी मान्यवरांसह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4820a140-8b2c-11e8-bb02-d97c9b4d9dba’]

यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते पोपटभाई ताकवणे यांनी  निषेध सभेत बोलताना राज्य आणि केंद्रसरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असून शेतकरी विरोधी धोरणे राबवत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांची कोंडी करण्यासाठी हे सरकार इतर राज्यातून दूध मागवत असून आता तर केंद्र सरकाने इतर देशांशी करार करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी चालवली असल्याचा आरोप केला. काँग्रेसचे अशोक फरगडे यांनी बोलताना सरकारच्या शेती आणि शेतकरी विषयक धोरणांवर कडाडून टिका केली आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना त्याच्या घामाचे पैसे मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे सांगितले. राज्यामध्ये सुरू असलेल्या राजू शेट्टी यांच्या दूध आंदोलनाला यावेळी सर्व शेतकऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला.