डीएसके प्रकरणात महाराष्ट्र बँकेच्या ‘त्या’ तीन अधिकार्‍यांची चौकशी होणार

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिध्द बिल्डर डीएसके गोत्यात आल्याचे सर्वांना माहित आहे. आता डीएसके प्रकरणातील धक्‍कादायक बाबी समोर येत असून डीएसके प्रकरणात महाराष्ट्र बँकेच्या अध्यक्षांसह तीन अधिकार्‍यांची चौकशी होणार असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र बँकेच्या अधिकार्‍यांवर डीएसके घोटाळयात सहभागी असल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांची चौकशी होणार आहे. डीएसके यांच्या अनेक कंपन्या होत्या. त्यापैकी काही कंपन्या केवळ कागदावर होत्या. प्रत्यक्षात त्या कंपन्या अस्तित्वात नव्हत्या. तरी देखील बँकेच्या काही अधिकार्‍यांनी डीएसकेंच्या त्या कंपन्यांना कर्ज दिल्याचा आरोप होत आहे. आरोपामध्ये तथ्य आहे अथवा नाही हे चौकशीनंतर निष्पन्‍न होणार आहे. महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रविंद्र मराठे, कार्यकारी संचालक आर.के. गुप्‍ता आणि माजी विभागीय अधिकारी पद्माकर देशपांडे यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. गुंतवणुकदारांचे पैसे थकविल्याप्रकरणी सर्वप्रथम डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांच्याविरूध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा अटकपुर्व जामिन फेटाळला. पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना दिल्‍ली येथुन अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीत असतानाच डीएसके जमिनीवर कोसळले. त्यांना ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांची रवानगी येरवडा कारागृहात झाली.

डीएसके घोटाळयाची व्याप्‍ती वाढत असतानाच डीएसकेंच्या जवळच्या नातेवाईकांना देखील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. घोटाळयाचे चार्जशीट न्यायालयात दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास चालु असतानाच आता महाराष्ट्र बँकेच्या अधिकार्‍यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रविंद्र मराठे, कार्यकारी संचालक आर.के.गुप्‍ता आणि माजी विभागीय अधिकारी पद्माकर देशपांडे यांची चौकशी होणार असल्याचे बँकींग क्षेत्रासह पुण्यात खळबळ उडाली आहे. डीएसकेंच्या ज्या कंपन्या केवळ कागदावर होत्या. त्या कंपन्यांना महाराष्ट्र बँकेच्या अधिकार्‍यांनी कर्ज दिल्याचा आरोप आहे.