उच्चभ्रू सोसायटीत गणपती मिटींगमध्ये एकाला बेदम मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

वाकड, काळेवाडी फाटा येथे उच्चभ्रू राहत असलेल्या पार्क स्ट्रीट सोसायटीमध्ये गणपती उत्सवाच्या नियोजनासाठी आयोजित मिटिंगमध्ये एका सभासदास काठीने बेदम मारहाण केली. हा प्रकार २० ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊच्या सुमाराला घडला होता, मात्र जखमी झालेल्यांची मानसिक स्थिती बिघडल्याने ३० ऑगस्ट रोजी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B0756RF9KY,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’40b0035e-acf2-11e8-8ccd-4130076c5342′]

या प्रकरणी विशाल सुधाकर पाटील (४३, रा. पार्क टरक्वाइज पार्क स्ट्रीट, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. तर सुदर्शन यादव (६०२, टरक्वाइज पार्क स्ट्रीट, वाकड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काळेवाडी फाटा येथील पार्क स्ट्रीट सोसायटीमध्ये २० ऑगस्ट रोजी गणपती उत्सवाच्या नियोजनासाठी मिटिंगचे आयोजन केले होते.

सोसायटीचे सभासद मिटिंगला आले होते. गणपती उत्सवाची चर्चा सुरु होती. त्यावेळी पाटील आणि यादव यांच्यात वादावाद झाली. यातून चिडलेल्या यादव यांनी पाटील यांना लाकडी काठीने बेदम मारहाण केली. यामध्ये पाटील जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. या प्रकारामुळे पाटील यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. यातून ते बाहेर आल्यानंतर त्यांनी काल वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र यादव याच्यावर अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही. तपास वाकड पोलीस करत आहेत.

‘तो’ व्हायरल मॅसेज फेक : बँका सलग आठ दिवस बंद नाहीत