शेतकऱ्यांच्या नावे कर्ज प्रकरणात मुख्य शेतकी अधिकाऱ्यांसह दोघांना अटक

गंगाखेड (परभणी) : पोलीसनामा ऑनलाईन – बनावट कागदपत्रांच्या आधाने शेतकऱ्यांच्या नावे कर्ज प्रकरणात मुख्य शेतकरीअधिकाऱ्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे. औरंगाबाद गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पथकाने गंगाखेड शुगरचे मुख्य शेतकी अधिकारी, ऊस पुरवठा अधिकारी व ऊस विकास अधिकारी यांना आज (बुधवार) अटक केली.

राज्यभर गाजलेल्या Farmerशुगरच्या शेतकरी कर्ज प्रकरणात गंगाखेड पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास औरंगाबाद येथील गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे. विभागाच्या पोलीस अधीक्षक लता फड, उपअधीक्षक पठाण यांच्या पथकाने आज सकाळी गंगाखेड शुगरचे मुख्य शेतकी अधिकारी नंदकुमार रतनलाल शर्मा, ऊस पुरवठा अधिकारी तुळशीदास मारुती अंभोरे, ऊस विकास अधिकारी बच्चूसिंग महादु पडवळ अशा तिघांना अटक केली. या कारवाईने कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

बँकांशी संगनमत करून हजारो शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलण्याचा प्रताप ‘गंगाखेड शुगर अँड एनर्जी’च्या रत्नाकर गुट्टे यांनी केला. या प्रकरणात गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तब्बल आठ ते दहा हजार शेतकऱ्यांच्या नावे नावावर ३२८ कोटी रूपये उचलून फसवणूक व अपहार केल्याचे तपासात उघड झाले आहे.