चौथ्या टप्प्यात १७ मतदारसंघामध्ये ३२३ उमेदवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी राज्यातील मतदानाच्या चौथ्या टप्प्यात १७ मतदारसंघामध्ये ३२३ उमेदवार आहेत. यामध्ये २८६ पुरूष तर ३७ महिला उमेदवार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

भिवंडी, मुंबई-दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकही महिला उमेदवार निवडणूक रिंगणात नाही. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्याचे मतदान झाले असून पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात एकूण ८६७ उमेदवार आहेत. यामध्ये ७८७ पुरूष उमेदवार तर ८० महिला उमेदवार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

मतदारसंघनिहाय उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे.
नंदूरबार – ११, धुळे – २८, दिंडोरी – ८, नाशिक – १८, पालघर – १२, भिवंडी- १५, कल्याण – २८, ठाणे – २३, मुंबई उत्तर – १८, मुंबई उत्तर-पश्चिम – २१, मुंबई उत्तर पूर्व – २७, मुंबई उत्तर-मध्य – २०, मुंबई दक्षिण-मध्य – १७, मुंबई-दक्षिण – १३, मावळ – २१, शिरुर – २३ आणि शिर्डी मतदारसंघात २० उमेदवार असल्याची माहिती देण्यात आली आहे.