माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या त्रासाने मुख्याध्यापक डिप्रेशनमध्ये

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

माहिती अधिकाराचा वापर करुन माहिती घेऊन मुख्याध्यापक पदाची मान्यताा रद्द करण्याबाबतचे शाळा न्यायाधिकरणामधील प्रकरण मिटविण्यासाठी मुख्याध्यापकाकडे ५ लाख रुपयांची खंडणी एका माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणवून घेणाऱ्याने केली असून त्यामुळे मुख्याध्यापक डिप्रेशनमध्ये गेले. अहमदनगरच्या कोतवाली पोलिसांनी या माहिती अधिकार कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शेख अकबर शब्बीर (रा. अहमदनगर एक्सप्रेस, डी. एस. पी आॅफिसजवळ, रहेनुमिर्या कॉलनी, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

[amazon_link asins=’B073T3DG4Y’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’da76b433-96cb-11e8-ad22-e72932468cf4′]

याप्रकरणी भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुलचे मुख्याध्यापक उल्हास पोपट दुगड (वय ४७, रा. मधुबन कॉलनी, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. दुगड हे २ जून २०१५ रोजी भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुलमध्ये मुख्याध्यापकपदावर रुजू झाले. त्यानंतर शेख शब्बीर याने माहिती अधिकार कायद्यान्वये त्यांची वैयक्तिक माहिती मागण्यास सुरुवात केली. त्याने २० मे ते २५ जून दरम्यान अहमदनगर एज्युकेशन सोसायटीकडे अर्ज करुन दुगड यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्राची माहिती मागितली. शिक्षणाधिकाºयांकडे  मुख्याध्यापकपदी नियुक्ती करताना केलेला प्रस्तावाची माहिती मागितली. तसेच १९९५ ते १९९८ सालातील हजेरी पत्र व पगार स्लीप बाबतची माहिती मागितली. तसेच ज्येष्ठता यादी, रोस्टर, अनुषेश, मुख्याध्यापक पदासाठी अपंगत्वाचे आरक्षणण देण्यात आलेले परिपत्रक, अशी वेळोवेळी त्यांची वैयक्तिक माहिती घेतली. त्यावरुन तुम्ही अपंग असून सुद्धा तुम्हाला मुख्याध्यापकपद कसे दिले असे चार चौघात भेटून हिणविण्यास सुरुवात केली. त्यावर त्यांनी मी लहानपणापासून अपंग आहे. मला त्रास देऊ नका असे सांगितले. त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे मुख्याध्यापक पदाला हरकत घेतली. शेख यांच्या तक्रारीवरुन शिक्षण उपसंचालकांनी दुगड यांची मुख्याध्यापकपदाची मान्यता रद्द केली. त्यावर मुख्याध्यापकांनी सोलापूरच्या शाळा न्यायाधिकरणाकडे धाव घेतली त्यांनी त्याला स्थगिती दिली.

त्यानंतर शेख याने पोपट लोढा व रुपेश दुग्गड यांना मुख्याधयापकांच्या कार्यालयात पाठविले. हे प्रकरण मिटविण्यासाठी मोठ्या रक्कमेची तडजोड करावी लागेल. त्यानंतर ३ एप्रिल २०१८ रोजी शाळेत येऊन शेख याने त्यांच्याकडे ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास होऊन पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. ते डिप्रेशनमध्ये गेले. त्यांच्यावर अजूनही औषधोपचार सुरु आहेत. त्यांनी हे प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे अध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे यांच्याकडे तक्रार दिली. त्यांनी लक्ष घातल्यानंतर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.