आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात नगरसेवकाने सोडले डुक्कर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

थेरगाव परिसरात डुकरांचा सुळसुळाट झाला असून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज पालिकेच्या निषेधार्थ शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले यांनी पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्या कार्यालयात डुक्कर सोडले. यामुळे काही वेळ पालिकेत चांगलीच पळापळ झाली.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’07d674a9-af66-11e8-a2bc-9de2f077d311′]

थेरगाव, गणेशनगर, गुजरनगर, मंगलनगर, वाकड रोड या परिसरात डुक्करांचा सुळसुळाट सुरु आहे. गेल्या दोन वर्षांपासून डुक्करांच्या त्रासाने नागरिक त्रस्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून डुक्करांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांना निवेदन दिले होते. त्यांना डुक्करांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. परंतु, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे या परिसरात डुकरांचा उपद्रव वाढला आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

राहिरात

थेरगाव परिसरात २०० ते ३०० डुक्करे आहेत. त्यांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त असून पालिका डुक्करांचा बंदोबस्त करत नाही. त्याच्या निषेधार्थ जिवंत डुक्कर अतिरिक्त आयुक्त, आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेट दिल्याचे, नगरसेवक सचिन भोसले यांनी सांगितले.

थेऊर जवळील नदीत महिलेसह दोन मुले बुडाली

राहिरात