Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 20482 नवे पॉझिटिव्ह तर 515 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. देशात राज्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 11 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. राज्यात रुग्णसंख्या वाढत असताना मृतांची संख्या वाढत असल्याने चिंता अधिक वाढली आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोना बळींच्या संखेने नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासात राज्यात 515 रुग्णांच्या मृत्यू नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात 30 हजार 409 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.77 इतका आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 20 हजार 482 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10 लाख 97 हजार 856 एवढी झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले असून राज्यात रुग्ण सापडण्याचे प्रमाण 20.29 टक्के इतके आहे. राज्यात रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. राज्यात गेल्या 24 तासात 19 हजार 423 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 7 लाख 75 हजार 273 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.62 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 2 लाख 91 हजार 797 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 17 लाख 34 हजार 164 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 37 हजार 225 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आतापर्यंत 54 लाख 09 हजार 060 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 10 लाख 97 हजार 856 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरीत जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.