3 वर्षात महाराष्ट्रातील 11 हजार तरूण लष्करात दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लष्करात दाखल होणे हे तरुणांमध्ये एक स्वप्न असते, इच्छा असते. नुकत्याच लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील सुमारे ११ हजार तरुण तीन वर्षांमध्ये लष्करात दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.

भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे हे सुद्धा महाराष्ट्रातील आहे. संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी लोकसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षांमध्ये देशभरातील १ लाख ५४ हजार ९०२ तरुण भारतीय लष्करात दाखल झाले आहे. भारतीय लष्करात गेल्या तीन वर्षात विविध रिक्त पदांच्या माध्यमातून राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील तसेच नेपाळ मधील सरासरी ९५% तरुण लष्करात दाखल झाले असून, एकट्या महाराष्ट्रातील ११ हजार ८६६ तरुणांचा समावेश आहे.

भारतीय लष्करातील दाखल होणाऱ्या तरुणांची आकडेवारी खालीलप्रमाणे.

वर्ष             :  एकूण भारतातील (कंसात महाराष्ट्र्रातील)

२०१६-१७   : ५२ हजार ८६      (३ हजार ९८०)

२०१७-१८   : ४९ हजार ४३८    (३ हजार ८३६)

२०१८-१९    : ५३ हजार ३७८    (४ हजार ५०)

महाराष्ट्रातील सातारा व कोल्हापूर जिल्हातील प्रत्येक गावातील तरुण लष्करात भरती होतो. या दोन जिल्हातील काही गावे अशी देखील आहेत जिथे प्रत्येक घरातील एक तरुण लष्करात असतो. तर काही घरांमधील तीन ते चार पिढ्या या लष्करात दाखल झालेल्या आहे. त्यामुळे अशा गावांना सैन्याचं गावही म्हटलं जात.