वादळामुळं पुण्यात गेल्या 48 तासात 160 झाडपडीच्या घटना तर 15 मोठया वाहनांचं प्रचंड नुकसान
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात देखील चक्रीवादळाने चांगलाच धुमाकूळ घातला असून, वादळी वाऱ्यात गेल्या दोन दिवसात तबल 160 झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. मात्र 15 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
राज्यात चक्रीवाडळामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि वारे वाहत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा या शहरांना याचा मोठा फटका बसला असला तरी पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरात दोन दिवसात जवळपास 160 झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. तर पावसामुळे पाणी साठले आहे. नाले आणि रस्त्यावरून पाणी वाहिले आहे. पाहिल्याच पावसात झाडपडी घटनाची नोंद झाली आहे. तसेच 15 वाहनांचे झाड पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हरातील विविध भागात या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी झालेल्या तुफान पावसाने अनेकांचा बळी घेतला होता. दोन ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात 25 बांधकाम मजूर मरण पावले होते. त्यामुळे प्रशासनाने यंदा याची पूर्वीच खबरदारी घेतली तर दुर्घटना टळू शकतात. तर नाले आणि रस्त्यावरून पाने वाहिल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. या पाण्यात वाहने तर वाहून गेली होतीच पण मानस देखील वाहून गेले होते. त्यामुळे पूर्वानुभावरून प्रशासनाने यंदा खबरदारी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे.
शहरात रस्त्यावर पडलेली झाडे काढण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानाकडून सुरू आहे. मोठ्या प्रमाणात झाडे पडल्याने अग्निशमन दलाला अडथळे निर्माण झाले आहेत. शहरातील कोथरूड, हडपसर, विश्रांतवाडी, विमाननगर, पाषाण, मुंढवा, डेक्कन, मध्यवस्तीचा परिसर, कोरेगाव पार्क, येरवडा, गंजपेठ, मालधक्का चौक, मनपा अश्या सर्वच भागात झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.