Coronavirus : चिंताजनक ! राज्यात 48 तासात 278 पोलिस ‘कोरोना’ पॉझिटिव्ह तर 6 जणांचा बळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशातील काही राज्यामधील परिस्थिती चिंताजनक आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या पाहता परिस्थिती बिकट आहे. गेल्या 48 तासामध्ये राज्यातील तब्बल 278 पोलिसांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे तर 6 जणांचा बळी गेला आहे. त्यामध्ये मुंबई-पुण्यासह इतर ठिकाणच्या पोलिसांचा समावेश आहे.

राज्यात आतापर्यंत तब्बल 1666 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये 1177 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आतापर्यंत 473 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनामुळं महाराष्ट्र पोलिस दलातील 16 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक येथील पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. पोलिसांवर पडत असलेला ताण पाहून राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे राज्यात केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या 10 तुकडया तैनात कराव्यात अशी मागणी केली होती. त्यास मंजुरी यापुर्वीच देण्यात आली असून मुंबई-पुण्यासह इतर ठिकाणी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे जवान आता तैनात झालेले आहेत. कोरोनाचा राज्य पोलिस दलात झालेला शिरकाव आणि आतापर्यंत गेलेले 16 जणांचे बळी ही चिंताजनक बाब आहे.