‘सिम्बायोसिस’च्या मूल्यमापन हेडनेच विद्यार्थ्याना गुण वाढवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात, 178 विद्यार्थ्यांचे पैसे घेऊन गुण वाढवले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील प्रसिद्ध सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या मूल्यमापन हेडनेच विद्यार्थ्याना गुण वाढवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. तबल 178 विद्यार्थ्यांचे पैसे घेऊन गुण वाढवले आहेत. 2018 व 19 शैक्षणिक वर्षात हा प्रकार घडला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी हेड संदीप हेगळे (रा. नवश्या मारुतीजवळ, सिहगड रोड) आणि अमित कुमार (रा. हैद्राबाद) यांच्यावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सिम्बायोसिसचे नामदेव कुंभार (वय 58) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या मूल्यमापन विभागात नोकरीस आहेत. तर आरोपी हेंगळे हा या विभागाचा हेड आहे. दरम्यान काही विद्यार्थ्यांच्या बनावट केस हिस्ट्री तयार करून त्यांचे गुण वाढवले. सुमित अग्रवाल या विद्यार्थ्याचे पेपरचे गुण वाढवले आहेत. दरम्यान हा प्रकार फिर्यादी यांना लक्षात आला. त्यांनी याची माहिती काढली. त्यावेळी त्याने व अमित याने एकूण 178 विद्यार्थ्यांचे पैसे घेऊन गुण वाढवले असल्याचे दिसून येत असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयाच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यांनी संस्थेमार्फत त्याची प्राथमिक चौकशी केली. त्यात हा प्रकार उघडकीस आला. यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दिली आहे.

दरम्यान, हेंगळे हा हेड आहे. त्यांच्यामार्फत हे गुण वाढवले जाऊ शकतात. संगणक वी वीभागाचे काम त्याच्या देखरेखीखाली चालते. पैसे घेऊन गुण वाढवले आहेत. पण हे पैसे त्या-त्या सेंटरच्या माध्यमातून वाढवले गेले आहेत. सोसायटीकाढून सर्व सुविधा असल्यानंतर त्याना सेंटर सुरू केले जाते. त्यानुसार हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जाते. अधिक तपास सुरू आहे. हा गुन्हा झिरोने चतुशृंगी पोलिसांकडे पाठविण्यात आला आहे. त्याचा तपास करण्यात येत आहे.
या गुण वाढ प्रकरणाने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे लॉकडाऊन आणि त्यामुळे बंद असणारे महाविद्यालय व शाळा व त्यात उजेडात आलेला हा प्रकार यामुळे पालक आणि विद्यार्थी देखील हैराण झाले आहेत.