लॉकडाऊन मध्ये 5 हजार रुपयांची घेतली लाच, सहायक निरीक्षकासह पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  अमरावती पोलीस दलातील सहायक निरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्यास 5 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडण्यात आले. दाखल गुन्ह्यातून नाव काढून सहकार्य करण्यासाठी त्यांनी लाच घेतली. काही वेळापूर्वी ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे अमरावती पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

सहायक पोलिस निरीक्षक राहुल रामधन जाधव (वय 40 वर्ष) व पोलीस शिपाई वैभव अशोकराव डोईफोडे (वय 33 वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.

सहायक निरीक्षक राहुल जाधव हे अमरावती पोलीस ठाणे पोलीस ठाण्यात कर्तव्यास आहेत. नागपुरी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. तर वैभव देखील याच पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत.
दरम्यान यातील तक्रारदार यांच्या भाच्यावर नागपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्यात आरोपींमधून नाव काढण्यासाठी व सहकार्य करण्यासाठी जाधव यांनी 5 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत त्यांनी अमरावती लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यातच जाधव यांच्या सांगण्यावरून डोईफोडे यांना 5 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. यानंतर दोघांना एसीबीने ताब्यात घेतले.

अमरावती लाच लुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल तसरे व पथकातील विनोद कुंजाम, युवराज राठोड, वैभव जायले, सुनील जायेभाये, सतिश किटुकुले यांनी ही सापळा कारवाई केली.

—चौकट—

कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या क्रं – 917212 553055 व टोल फ्रि क्रं 1064 यावर संपर्क साधावा असे आवाहन धिवरे यांनी केले आहे.