मसुरीत जुळत आहेत IAS अधिकाऱ्यांची मने

नवी दिल्ली : वृत्तसंसथा

आपल्या बॅचमेट किंवा सिनिअर ज्युनिअर यांच्याशी प्रेम होऊन लग्न करणे ही खूप सामान्य बाब आहे. याचप्रमाणे मसुरीत प्रशिक्षण घेणाऱ्या IASअधिकाऱ्यांबाबतीत देखील असेच काहीसे घडते आहे. गेल्या तीन वर्षात मसुरी येथील प्रशिक्षण केंद्रात ५२ IAS अधिकाऱ्यांची मने जुळली आहेत.

देशात २०१५ मध्ये UPSC परीक्षेत पहिल्या आलेल्या टीना डाबीने तिच्याच बॅच मधील अतहर खान यांनी लग्न केल्यानंतर त्याची बरीच चर्चा  झाली होती. उत्तराखंडमध्ये असलेल्या मसुरी प्रशिक्षण अकॅडमीत या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर आता २०१६ च्या बॅच मध्ये देखील  प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी या दोघांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. या बॅच ने नुकतेच  त्यांनी मसूरीतील लाल बहाद्दुर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमधून आपली पहिली असाईनमेंट पूर्ण केली. २०१६च्या बॅचमध्ये एकूण १५६ IAS अधिकारी होते. त्यामधील १२ जोड्यांनी प्रशिक्षण कालावधीत लग्न केले. यातील एकाने २०१७ च्या बॅचमधील ज्युनिअरशी तर एकाने आपल्या सिनिअरशी लग्न केले.
[amazon_link asins=’B07CKPLGDT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f89cce3a-8a76-11e8-9a2a-2fdbe3d7ef38′]

IAS अधिकाऱ्यांनी आपल्याच बॅचमेट किंवा इतर बॅच मधील अधिकाऱ्यांसोबत लग्न  करणे ही काही नवी बाब नाही. मात्र गेल्या तीन वर्षांपासून हे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. २०१७ च्या बाबतीत पाहिल्यास या बॅच मधील ६ अधिकारी अजून प्रशिक्षण घेत आहेत. ज्यांनी आपल्या सहकारी IAS अधिकाऱ्याशी लग्न केले आहे. २०१५ मधील १४ अधिकाऱ्यांनी आपल्या ज्युनिअर आणि सिनिअरशी लग्न केले. टीना डाबी देखील याच बॅच मध्ये होत्या. मागील तीन वर्षात जवळपास ५२  IAS अधिकाऱ्यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांशी लग्न केले आहे.
जादू मसुरीची … 
याबाबत बोलताना माजी गृहसचिव जी. के. पिल्लइ यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या प्राक्रियेचे मसुरी चे कौतुक केले आहे . “मसुरी सुंदर आणि रोमँटिक ठिकाण आहे.  पिल्लइ हे १९७२ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनीही बॅचमेट असेल्याच सुधा यांच्याशी लग्न केले होते. आपल्याच सहकारी अधिकाऱ्यांसोबत लग्न करण्याबद्दल एका अधिकाऱ्याने सांगितले की, जर दोघांचेही काम एकच असेल तर एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या बदल्यांनंतर जुळवून घेण्यात अडचण येत नाही.  लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्यानंतर तरुण येथे प्रशिक्षणासाठी येतात आणि त्याकाळात ते प्रेमात पडतात. असे पिल्लइ म्हणाले.
[amazon_link asins=’B07F823B29′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0e170111-8a77-11e8-8323-c541d2f96df2′]
या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण काळातील या विवाहांमुळे  मात्र सरकारला अडचणी निर्माण होत आहेत. कारण या अधिकाऱ्यांची पोस्टिंग करताना दोघांना एका राज्यात काम करता येईल याचा मेळ घालावा लागतो. तसेच नियमाप्रमाणे   IAS  अधिकाऱ्यांना आपल्याच राज्यात बदली करून घेता येत नाही. पण काही अपवादात्मक परिस्थितीत यात सूट दिली जाते. यामुळे पोस्टिंग करताना बरीच कसरत करावी लागते.