नियोजन समितीच्या बैठकीत कॉंग्रेस- सेना आमदार भिडले

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या आज बैठक पार पडली. या बैठकीत नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. याबाबत काँग्रेस आमदार व समिती सदस्य विचारणा करण्यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे गेले असता, बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर नंतर धक्काबुकीत झाले.
नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या आज बैठक होती. या  बैठकीत जिल्हा निधी वाटपासाठी आमने सामने झाल्याची चर्चा सभागृहात रंगली. बैठकीनंतर हा वाद आणखी वाढला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी वाटपावरून कॉंग्रेस -सेना सदस्य आमने सामने भिडले आणि सेना – काँग्रेसच्या आमदारांमध्ये धक्का बुक्की झाली. पालकमंत्री रामदास कदम यांच्या समोर काँग्रेस आमदार अमरनाथ राजूरकर आणि सेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्यात धक्का बुक्की झाली.
काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर व पालकमंत्री कदम यांच्यात प्रारंभी शाब्दिक वादावादी झाली, त्यानंतर काँग्रेस व शिवसेना आमदार तसेच कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. यावेळी दोन्ही बाजूनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.पालकमंत्री रामदास कदम व आ. राजूकर याची बंद खोलीमध्ये चर्चा झाल्यानंतर सर्व जण निघून गेले. पालकमंत्री नियोजन समिती सदस्यांच्या हक्कावर गदा आणत असल्याचा आरोप यावेळी कॉंग्रेसने केला.