‘कमाली’च्या दुष्काळतही महाराष्ट्रातील ‘या’ महिलेनं विक्रमी पीकाचं उत्पादन घेतलं, PM नरेंद्र मोदींनी केलं ‘सन्मानित’

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त असलेल्या परभणीमध्ये महिला शेतकऱ्याने पाण्याचं नियोजन करून पीक घेत विक्रम नोंदवला आहे. केंद्र सरकारने या महिलेचा कृषी कर्मन पुरस्काराने सन्मान केला आहे. सुमन रेंगे असं या महिला शेतकऱ्याचं नाव आहे. 2 जानेवारी रोजी बंगळुरूमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात सुमन रेंगे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कृषी कर्मन पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाण्याचं नियोजन करत त्यांनी रेकॉर्डब्रेक पीक घेतलं.

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांपैकी एक म्हणजे परभणी जिल्हा आहे. या जिल्ह्यातील जांब गावातील महिला शेतकरी सुमन रेंगे यांनी पाण्याचं योग्य नियोजन करून विक्रमी पीक घेतलं. दुष्काळग्रस्त भागातही त्यांनी जलसंधारणाचा यशस्वी वापर केला. 2015 पासून या भागात पाणीटंचाई आहे. अशात सरकारी योजनेचा वापर करत सुमन रेंगे यांनी शेतात तलाव बांधला. सर्वांची शेती बरबाद झाली होती. पीक कोरडे पडले होते. अशात रेंगेंचं शेत हिरवंगार होतं. याशिवाय त्यांनी रेकॉर्डब्रेक पिकांचं उत्पादन घेतलं. त्यांची एकूण 10 एकर शेती आहे. एका हेक्टरमध्ये त्यांनी 26 क्विंटल सोयबीन तर एका हेक्टरमध्ये 22 क्विंटल वाटाण्याचं उत्पादन घेतलं.

सुमन रेंगे यांना कामगिरीसाठी गौरवण्यात आलं. पुरस्कारात त्यांना प्रशस्तिपत्रक आणि 2 लाख रुपये मिळाले. 2016-17 च्या कृषी योगदानासाठी त्यांना या हा पुरस्कार देण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/