‘कोरोना’ संकटात ही कंपनी 20 हजार महिलांना देणार नोकरी, 1.5 लाखापर्यंत असेल Salary !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना संकटात ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट महिलांसाठी चांगली बातमी आहे. अ‍ॅडटेक स्टार्टअप व्हाइटहॅट ज्यूनियरने म्हटले आहे की, ते आपल्या प्लॅटफॉर्मसोबत भारतात महिला टिचर्सची संख्या वाढवत आहेत. कंपनी रोज 220 टीचर्सला प्लॅटफॉर्मशी जोडत आहे. आतापर्यंत त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 7,000 पेक्षा जास्त टिचर आहेत. त्यांची योजना वर्षाच्या अखेरपर्यंत 20,000 टिचर्सना आपल्या सोबत जोडण्याची आहे. म्हणजे यावर्षी कंपनीची योजना आणखी 13,000 टिचर्सची भरती करण्याची आहे.

अनेक देशांमध्ये सतत वाढत आहेत विद्यार्थी
व्हाइटहॅट ज्युनियरचे नुकतेच बायजूसने अधिग्रहण केले होते. व्हाइटहॅट ज्यूनियरने म्हटले की, भारत, अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे प्लॅटफॉर्मला जास्त टिचर्सची गरज आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ते आपल्या प्लॅटफॉर्मवर टिचर्सची संख्या वाढवत आहेत. कोरोना संकटामुळे डिजिटल एज्युकेशन आणि शिक्षणाच्या पद्धतींमध्ये नव्या प्रयोगाचे युग सुरू आहे.

व्हाइटहॅट ज्युनियरचे संस्थापक आणि सीईओ करण बजाज यांनी म्हटले की, पॅरेंट्सने सुद्धा ऑनलाइन लर्निंग समजून घेतले आहे. पॅरेंट्स मुलांच्या अभ्यासाठी नव्या पद्धतीचे पूर्ण समर्थन करत आहेत. सध्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मशी जोडल्या गेलेल्या टिचर्समध्ये 84 टक्केंचे वय 35 वर्षांपेक्षा कमी आहे. ते आपल्या घरी राहून मुलांना शिकवत आहेत आणि महिन्याला सरासरी 50 हजार ते 1.5 लाख रुपयांपर्यंत कमावत आहेत. बहुतांश टिचर्स पोस्ट ग्रॅजुएट आहेत. या कंपनीची स्थापना 2018 मध्ये झाली होती.