पोलीस अकादमी परीक्षेत ११९ IPS अधिकारी नापास

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाईन

 

हैद्राबाद येथे भारतीय पोलीस सेवेत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांची परीक्षा झाली होती. या परीक्षेत १२२ पैकी ११९ आयपीएस अधिकारी नापास झाल्याचा निकाल हाती आला आहे.

सरदार वल्‍लभभाई पटेल राष्‍ट्रीय पोलिस अकादमीत झालेल्या या परीक्षेत भावी अधिकार्‍यांना उत्तीर्ण होणे आवश्यक असते. या अधिकार्‍यांना पास होण्यासाठी तीन संधी दिल्या जातात. त्यामध्ये उत्तीर्ण न झाल्यास त्यांना सेवेतून बाहेर काढले जाऊ शकते. सध्या सर्वांना पात्र ठरवून विविध केडर देण्यात आले आहेत. परंतु त्यांना उर्वरित दोन प्रयत्‍नात प्रत्येक विषयात पास व्‍हावे लागणार अहो. परंतु भावी अधिकार्‍यांचे एवढ्या मोठ्या संख्येने नापास होणे चिंतेचा विषय आहे.

[amazon_link asins=’B01EU2M62S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9e10a280-828d-11e8-a60a-6faac46f1b96′]

दरम्यान, २०१६ मध्ये केवळ दोनच अधिकारी अकादमी पास झाले नव्‍हते. यंदा फॉरेन पोलिस फोर्ससह एकून १३६ आयपीएस अधिकार्‍यांतून १३३ जण एक किंवा त्याहून अधिक विषयांत नापास झाले आहेत. यात भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि दंड प्रक्रिया संहिता (सीपीसी) यांचाही समावेश आहे.

[amazon_link asins=’B00ND4OM5O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ab69fe3f-828d-11e8-ae61-b1b1a4f1d30a’]

ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये मेडल आणि ट्राफी घेतलेले अधिकारीही नापास झाल्याचे चिंताजनक आहे. तर फॉरेन पोलिस फोर्सचे सर्वच अधिकारी नापास झाले आहेत. एका अधिकार्‍याने सांगितले की, अकादमीच्या इतिहासात हे पहिल्यांदाच झाले आहे. परीक्षेत काहीजण नापास होतात. परंतु एवढ्या मोठ्या संख्येने नापास होण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रशिक्षणावेळी मिळालेले गुणे हे ज्येष्‍ठतेसाठी धरले जातात. नापास झाल्याने ज्येष्‍ठता कमी होते. अकादमीच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, अधिकारी नापास झाल्याने त्यांना नियुक्‍तीपासून रोखले जाऊ शकत नाही.