पोलीस वाहनात ‘टिकटॉक’ करणारा कुख्यात गुंड गजाआड

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – एका कुख्यात गुंडाने चक्क पोलिसांच्या वाहनात ‘टिकटॉक’ व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागात प्रचंड खळबळ उडाली होती. नागपूर पोलिसांनी पोलीस वाहनात टिकटॉक करणारा कुख्यात गुंड सय्यद मोबिन अहमद (रा. टिपू सुलतान चौक) याला अटक केली आहे. त्याच्यावर खून आणि गोवंश तस्करीचे अनेक गुन्हे दाखल असून तो तडीपार आहे.

या व्हिडीओमध्ये मोबिन हा स्वत:ला ‘गँगस्टर’ नाही तर ‘मॉन्स्टर’ सांगत आहे. ‘गँग के साथ आनेवाला गँगस्टर, लेकिन अकेला आनेवाला मॉन्स्टर’ या डायलॉगवर मोबिनने व्हिडीओ तयार केला होता. विशेष म्हणजे त्याने या व्हिडीओसाठी पोलिसांची एमएच ३१ एजी ९८२६ या वाहनाचा वापर केला होता. त्याने हा व्हिडीओ कोराडी पोलीस स्टेशनसमोर केला होता.

मोबिन हा कुख्यात चमा टोळीचा सुत्रधार आहे. ही टोळी चोरीच्या वाहनातून जनावरांची तस्करी करते. काही दिवसांपूर्वी यशोधरानगर पोलिसांनी मोबिनचा भाऊ सेबू याला वाहनचोरी प्रकरणात अटक केली होती. मोबिनविरुद्ध वरोरा, वणी व गिट्टीखदान पोलीस ठाण्यात खूनाचे प्रयत्न केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोन महिन्यापूर्वी पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांनी त्याच्या तडीपारीचे आदेश जारी केले होते.

You might also like