राज्यात 3 पक्षांचेच सरकार, मुख्यमंत्री शिवसेनेचाच : संजय राऊत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत आघाडीच्या नेत्यांची बैठकीदरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की आघाडीच्या नेत्यांनीच सांगितले आहे की राज्यात तीन पक्षांचे सरकार येणार आहे. आता किमान समान कार्यक्रमाहून आम्ही पुढे गेलो आहोत. सोनिया गांधीनी पर्यायी सरकार स्थापन व्हावे यासाठी पाठिंबा दिल्याची माहिती माझ्याकडे आहे.

पुढे संजय राऊत म्हणाले की बैठकीनंतर शरद पवारांची मी भेट घेईल. यावेळी मुख्यमंत्री कोण हे काँग्रेसला माहित आहे का असे विचारल्यावर संजय राऊत म्हणाले की मुख्यमंत्री कोण होणार याचे उत्तर आम्ही काँग्रेसला दिले आहे असे समजा.

तसेच मुख्यमंत्री कोण असणार असे विचारल्यावर संजय राऊत म्हणाले की राज्याचा कारभार पुढे नेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे, राज्यातील सूत्र त्यांनी हातात घ्यावी असे मला वाटते. परंतू शिवतीर्थावर शपथ विधी होईल तेव्हा कळेलच की कोण मुख्यमंत्री होणार. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे मात्र नक्की.

सत्तास्थापनेसाठी काही प्रक्रिया शिल्लक आहे. त्या प्रक्रिला जास्त वेळ लागणार नाही. प्रक्रिया फार काळ लांबणार नाही असे मला वाटते असे ही संजय राऊतांनी हे स्पष्ट केले. उद्धव ठाकरेंशी मी संपर्कात असल्याचे देखील राऊत यांनी यावेळी सांगितले.

पृथ्वीराज चव्हाण यांनी आघाडीच्या दिल्लीतील बैठकीनंतर म्हणाले की राज्यात सत्तेचा तिढा मिटवण्यासाठी आज आघाडीची बैठक झाली. लवकरात लवकर राज्यात स्थिर सरकार स्थापन होईल.

यावेळी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, सकारात्मक चर्चा झाली. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही. आम्ही लवकर राज्याला स्थिर सरकार देऊ.

Visit :  Policenama.com